शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात रुग्णसंख्या दोन लाखांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 05:05 IST

साथीचा जोर कायम; एकाच दिवसात आठ हजारांहून अधिक नवे रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झालेला असतानाच, कोरोना साथीचा जोर कायम आहे. देशभरात सोमवारी कोरोनाचे आठ हजारांवरनवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येने २ लाखांकडे वाटचाल केली आहे.

महिनाभरापूर्वी भारतात कोरोनाचे ३७ हजार रुग्ण होते. त्यांच्यात पाचपट वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार : आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ९५ हजारांवर झाली आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ४८.१८ टक्के इतके आहे. मुंबईत ४० हजारांवर रुग्ण आहेत. येथे आठ दिवसांत रुग्णसंख्या ३० हजारांवरून ४० हजारांवर गेली आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या दहा राज्यांत महाराष्ट्र पहिल्या, तर तमिळनाडू दुसºया क्रमांकावर आहे. तमिळनाडूमध्ये कोरोनाचे २३ हजारांवर रुग्ण असून, तिथे १८४ जणांचा बळी गेला आहे. दिल्लीत २० हजारांवर रुग्ण असून, बळींची संख्या ५००हून अधिक आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये गुजरात दुसºया क्रमांकावर होता. त्याला आता तमिळनाडूने मागे टाकले आहे. गुजरातमध्ये १७ हजारांवर रुग्ण असून, बळींची संख्या एक हजारांवर आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमधील निर्बंध मागे घेण्यासाठी तीन टप्प्यांची योजना आखली आहे. मात्र, त्याचे अनुकरण न करता राज्यांनी अनेक निर्बंध ३० जूनपर्यंत कायम ठेवले आहेत. प्रत्येक राज्य कोरोना साथीची त्यांच्याकडील स्थिती लक्षात घेऊन मगच निर्बंध हटविण्याबाबत निर्णय घेणार आहे.महाराष्ट्रासह चार राज्यांत चार हजारांवर बळीदेशातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली या चार राज्यांतील रुग्णांची संख्या १ लाख ३० हजारांवर गेली आहे. देशातील बळींची संख्या पाच हजारांहून अधिक झाली असून, त्यातील चार हजारांपेक्षा जास्त बळी महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्लीमध्ये गेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या