नवी दिल्ली : पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत आतार्पयत 5.29 कोटी बँक खाते उघडण्यात आले असून, 1.78 कोटी रुपे डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.
वित्त मंत्रलयाच्या एका अधिकृत निवेदनानुसार, गुरुवार दि. 1 ऑक्टोबर्पयत जन धन योजनेंतर्गत 5.29 कोटी बँक खाती उघडण्यात आली. यामध्ये 3.12 कोटी खाती ग्रामीण आणि 2.17 कोटी बँक खाती शहरी भागातील आहेत. 1.78 कोटी खाते रुपे कार्डशी संलग्न आहेत. दरम्यान, गेल्या 28 ऑगस्ट रोजी या योजनेचा प्रारंभ झाला होता.
पंतप्रधान जन धन योजनेचा लाभ सध्या बँक खाते असलेल्या व्यक्तीलाही मिळू शकतो. अशा खातेधारकांना यासाठी नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही. निवेदनानुसार, अभियान संचालक व अतिरिक्त अभियान संचालक यांनी सार्वजनिक क्षेत्रतील बँका व अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्डसइंड बँक यासारख्या खासगी बँकांच्या कार्यकारी संचालकांशी जन धन योजनेचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे किमान एक खाते बँकेत असावे असे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.
4बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या परिवारांचा शोध घेण्यासाठी बँकांद्वारे सध्या सव्रेक्षण सुरूआहे.
4 हे सव्रेक्षण येत्या 1क् ऑक्टोबर्पयत पूर्ण होईल. हरियाणा व महाराष्ट्र या दोन राज्यांत सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरूआहे. या राज्यांतील सव्रेक्षण प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, सरकार केरोसीन तेल व एलपीजीची सबसिडी थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यावरही विचार करत आहे.
4 नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जन धन योजनेची घोषणा केली होती.