शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नूहमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, इंटरनेट बंद; दंगलीनंतर पुन्हा ब्रिजमंडल शोभायात्रेवर विहिंप ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 08:54 IST

Nuh Shobha Yatra: सरकारने 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मोबाईल इंटरनेटवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे.

हरियाणातील नूहमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर पुन्हा एकदा ब्रिजमंडल शोभायात्रा काढण्याची विश्व हिंदू परिषदेने हाक दिली आहे. यामुळे तिथे पुन्हा दंगा भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बाहेरील व्यक्तींनाही प्रवेश बंदी करण्यात आली असून जिल्ह्यात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. तसेच इंटरनेटही बंद ठेवण्यात आले आहे. 

प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बल्क एसएमएस सेवाही बंद करण्यात आली आहे. नूहमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून, त्याअंतर्गत सोमवारपर्यंत चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सरकारने 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मोबाईल इंटरनेटवर बंदी घातली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) ममता सिंग यांनी रविवारी सांगितले की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  मुख्यमंत्र्यांनीही या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे. हरियाणा पोलिसांचे 1,900 कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या 24 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जवळच्या मंदिरात पूजा करण्याचे आवाहन केले आहे. 

31 जुलै रोजी हरियाणातील मेवात-नूह येथे ब्रिज मंडळ यात्रा काढण्यात आली होती. यादरम्यान यात्रेवर दगडफेक झाली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले. शेकडो गाड्या पेटवल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. नूह हिंसाचारात दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला होता.