शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एअर स्ट्राइकवेळी बालाकोटमध्ये 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्ह; गुप्तचर यंत्रणांकडून आकडेवारी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 19:36 IST

एअर स्ट्राइकच्यावेळी जवळपास 300 मोबाईल ऍक्टिव्ह असल्यानं तिथे किती दहशतवादी असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यावेळी त्या भागात 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्ह होते, अशी आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे हे फोन अ‍ॅक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागाला मिळाली होती. एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची चर्चा सुरू असताना ही आकडेवारी पुढे आली आहे. एअर स्ट्राइकच्यावेळी जवळपास 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्ह असल्यानं तिथे किती दहशतवादी असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी भारतीय हवाई दलाला मिळाली. यानंतर हवाई दलानं लक्ष्यभेद करण्याआधी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेनं (एनटीआरओ) तळांवर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 26 फेब्रुवारीला मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी बालकोटवर बॉम्बफेक केली. हवाई दलाच्या वैमानिकांनी जवळपास 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. यावेळी जैशचा मुख्य आणि सुरक्षित स्थळ समजल्या जाणाऱ्या बालाकोटमध्ये टॉप कमांडर्स आणि अनेक दहशतवादी वास्तव्यास होते. 'तांत्रिक देखरेख सुरू असताना तिथे जवळपास 300 मोबाईल फोन ऍक्टिव्ह असल्याचं आढळून आले. या भागात 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवाई दलानं बॉम्बफेक केली,' अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली. यावेळी देशाच्या इतर गुप्तचर यंत्रणादेखील एनटीआरओच्या संपर्कात होत्या. त्यांनादेखील बालाकोटच्या तळांवर 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्ह असल्याचं आढळून आले होते. मात्र हवाई दलाच्या कारवाईतील मृत दहशतवाद्यांचा आकडा अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. आज सकाळी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनीही मृत दहशतवाद्यांच्या संख्येवर बोलणं टाळलं. आम्ही लक्ष्यभेद करतो. मेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा मोजणं आमचं काम नाही, असं धनोआ म्हणाले होते.