शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

'अबकी बार बेटी पर वार' ; बनारस हिंदू विद्यापीठातील पोलीस लाठीचार्जवर संतप्त प्रतिक्रिया

By सागर सिरसाट | Updated: September 24, 2017 19:25 IST

बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी मध्यरात्रीपासून हिंसक वळण लागलं आहे.

वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी मध्यरात्री हिंसक वळण लागलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरु जी. सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींवर रात्री 10 वाजता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये काही विद्यार्थिनी जखमी झाल्या.काल मध्यरात्री बीएचयू हॉस्टेलमधून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते. 

या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं वृत्त आल्यापासून सोशल मीडियावर  #अबकी_बार_बेटी_पर_वार हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. विद्यापीठात सुरक्षेची हमी मागणा-या विद्यार्थिनींवर करण्यात आलेला लाठीचार्ज म्हणजे  'बेटी पर वार' असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

अनेकांनी पंतप्रधानांचा वाराणसी दौरा आणि रविवारच्या मन की बात कार्यक्रमासोबत या घटनेला जोडलं असून पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे.  जर मुलींच्या जागी गाय असती तर असा हल्ला झाला नसता अशे अनेक खोचक ट्वीट यावेळी करण्यात आले आहेत. 

काय आहे प्रकरण - फाइन आर्ट्स अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीची बाइकवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन दिवसांपूर्वी छेड काढली होती. त्याबाबत तिनं सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली असता, त्यांनी तिलाच उपदेशाचे डोस पाजले होते. अंधार झाल्यावर तू बाहेर काय करत होतीस, असं त्यांनी तिला विचारलं. हा सगळा प्रकार तिनं आपल्या मैत्रिणींना सांगितला होता, तेव्हा सगळ्यांनी मिळून धरणं आंदोलन करायचं ठरवलं होतं. आयआयटी-बीएचयू आणि महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. कुलगुरूंनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. परंतु, तेवढ्याने विद्यार्थिनींचं समाधान झालं नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोस्टर जाळून निषेध नोंदवला. त्यानंतरही आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होतं. पण, कुलगरू जी सी त्रिपाठी यांच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थिनींवर सुरक्षारक्षकांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती चिघळली.