शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संकटं संपेनात! कोरोनापाठोपाठ झिका विषाणूची एंट्री; १३ रुग्ण सापडल्यानं खळबळ; जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:50 IST

zika virus: १३ रुग्णांमध्ये एका गर्भवतीचा समावेश; अधिक तपासणीसाठी नमुने पुण्याला पाठवले

थिरुअनंतपुरम: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आता झिका विषाणूनं एंट्री घेतली आहे. केरळमध्ये आतापर्यंत १३ जणांना झिकाची लागण झाली आहे. त्यात एका गर्भवतीचा समावेश आहे. तिरुअनंतपुरमधून घेण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत. 

तिरुअनंतपुरममधल्या एका खासगी रुग्णालयात २८ जूनला एका २४ वर्षीय गर्भवतीला दाखल करण्यात आलं. या महिलेला ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे अशा स्वरुपाचा त्रास होत होता. जिकाची लक्षणं असल्यानं पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले. झिकाची लागण झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

सात जुलैला महिलेची प्रसुतीमहिलेनं ७ जुलैला बाळाला जन्म दिला. झिकाची लागण झालेली महिला राज्याबाहेर गेलेली नव्हती. झिकाग्रस्त महिला केरळच्या सीमावर्ती भागाची रहिवासी आहे. या विषाणूची लक्षणं दिसायला ३ ते १४ दिवस लागतात. बहुतांश लोकांमध्ये लक्षणंदेखील दिसत नाहीत. काही लोकांना ताप, शरीरावर चट्टे, डोकेदुखी, मांसपेशी आणि सांधेदुखीची समस्या जाणवते. 

पहिल्यांदा युगांडातील माकडांमध्ये सापडला होता झिकाजागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या नोंदीनुसार, झिका विषाणू एडीज डास चावल्यानं पसरतो. हे डास संध्याकाळी जास्त सक्रीय असतात. युगांडात पहिल्यांदा १९४७ मध्ये माकडांमध्ये झिका विषाणू सापडला. यानंतर १९५२ मध्ये युगांडा आणि टांझानियात माणसांना या विषाणूची लागण झाली. आशिया, आफ्रिका, अमेरिका, पॅसिफिक महासागरातील बेटांवर आतापर्यंत झिकाचे रुग्ण सापडले आहेत. 

टॅग्स :Zika Virusझिका वायरस