शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

आता भरतीत मोजणार नाहीत महिलांची छाती, हरयाणा सरकारकडून टीकेनंतर नियमांमध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 09:47 IST

सरकारने मोजमापाची अट काढून टाकली आहे.

गुरुग्राम : हरयाणामध्ये सरकारने सरकारी भरतीमध्ये महिलांच्या छातीच्या मापाच्या बाबतीत मोठा बदल केला आहे. नियमांमध्ये बदल करत सरकारने आता वनविभागातील रेंजर, डेप्युटी रेंजर आणि इतर पदांसाठी महिलांच्या शारीरिक चाचणीत (पीएमटी) छाती मोजण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. सरकारने मोजमापाची अट काढून टाकली आहे.

जुलै २०२३ मध्ये, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यकाळात, हरयाणा कर्मचारी निवड आयोगाने (एचएसएससी) वन विभागातील भरतीसाठी एक नवीन नियम जोडला होता, ज्या अंतर्गत महिला उमेदवारांच्या छातीचा आकार ‘सामान्य’ ७४ सेमी किंवा फुगविल्यानंतर ७९ सें.मी असावा, असे म्हटले होते.

त्याच वेळी पुरुषांसाठी, छातीचा आकार न फुगवता ७९ आणि फुगवल्यानंतर ८४ सेमी करण्यात आला होता. हरयाणातील विरोधी पक्षांनी याबाबत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही सरकारकडे नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती.

का घेतला निर्णय? वन विभागाच्या नियम दुरुस्ती बैठकीत सरकारने हरयाणा राज्य वन कार्यकारी शाखा गट-क सेवा (सुधारणा) नियम, २०२१ मध्ये सुधारणांना मंजुरी दिली होती. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या नियमांमध्ये दुरुस्ती केल्यामुळे विभागीय नियमांमध्ये असमानता निर्माण झाली होती. त्यामुळे महिला भरतीसाठी एकसमान निकष ठेवण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आता केलेल्या दुरुस्तीनुसार, छातीचे माप घेण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

महिला कार्यकर्त्यांनी उठवला होता आवाजहरयाणाच्या या नियमामुळे वाद निर्माण झाला होता. महिला अधिकार कार्यकर्त्यांनी या नियमावर टीका केली होती. काँग्रेसने याला ‘तुघलकी फर्मान’ असे म्हटले होते. अनेक महिला उमेदवारांनी या निर्णयावर टीका केली होती.हा आमच्या प्रतिष्ठेला छेडण्याचा प्रयत्न आहे. जर त्यांना आमच्या फुप्फुसाची क्षमता तपासायची असेल तर आम्ही समजू शकतो, परंतु किमान अट का घालण्यात आली, असा सवाल महिला उमेदवारांनी केला होता.

टॅग्स :Haryanaहरयाणा