शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:41 IST

पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये मतदान होणार आहे. त्यावेळी तेथील विशिष्ट मतदारांना या पद्धतीनेही मतदान करता येईल.

पाटणा : मोबाइल फोन ॲपच्या माध्यमातून मतदान (ई-मतदान) करण्याची परवानगी मिळालेले बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी सायंकाळी ही घोषणा केली. उद्या, शनिवारी पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये मतदान होणार आहे. त्यावेळी तेथील विशिष्ट मतदारांना या पद्धतीनेही मतदान करता येईल.

दीपक प्रसाद यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला आणि स्थलांतर केलेले मतदार अशा व्यक्ती मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नाही. त्यांना या ई-मतदान योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी मतदानासाठी ‘e-SECBHR’ ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. 

हे ॲप सध्या केवळ अँड्रॉइड फोनवरच उपलब्ध आहे. मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून ते त्यांच्या मतदार यादीतील नोंदणीकृत फोन नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. सी-डॅक या संस्थेने हे ॲप विकसित केले असून दुसरे एक ॲप राज्य निवडणूक आयोगानेही तयार केले आहे.

असे करता येईल ई-मतदान

ई-मतदानासाठी फक्त दोन नोंदणीकृत मतदार एका फोन नंबरवरून लॉगिन करू शकतात. प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र तपासून मतदानाची वैधता निश्चित केली जाईल. ज्यांच्याकडे मोबाइल नाही, त्यांनाही राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून मतदानाची सुविधा उपलब्ध आहे. 

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMobileमोबाइल