शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आता Aadhaar सोबत जोडलं जाणार व्होटर कार्ड, मतदानातील घोटाळा रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 10:50 IST

यात, बोगस मतदान आणि मतदार यादीत डबल नाव येणे रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे आणि एकच मतदार यादी तयार करणे आदी निर्णयांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बुधवारी एका विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यात, बोगस मतदान आणि मतदार यादीत डबल नाव येणे रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे आणि एकच मतदार यादी तयार करणे आदी निर्णयांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या विधेयकात सर्व्हिस व्होटर्ससाठी निवडणूक कायद्यांना 'जंडर न्यूट्रल'देखील बनवण्यात येईल. याशिवाय, तरुणांना आता वर्षातून चार वेगवेगळ्या तारखांना मतदार म्हणून नावनोंदणीही करता येईल, अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.

सध्या एक जानेवारी ही कट ऑफ डेट असल्याने अनेक तरुण मतदार यादीपासून वंचित राहत होते. उदाहरणच द्यायचे तर, अशा स्थितीत 2 जानेवारीला एखादा तरूण 18 वर्षांचा झाल्यानंतरही त्याला मदार म्हणून नाव नोंदणी करत येत नव्हती. यामुळे त्याला पुढची तारीख येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. मात्र, आता विधेयकात सुधारणा केल्याने तरुणांना वर्षातून चार वेळा मतदार म्हणून नाव नोंदणी करता येणार  आहे.

कायदा मंत्रालयाला सर्व्हिस मतदारांशी संबंधित लोक प्रतिनिधित्व अधिनियमाच्या तरतुदीत 'पत्नी' शब्दात 'पती/पत्नी' असा बदल करण्यास सांगण्यात आले होते. याच बरोबर निवडणूक आयोग (ECI) नाव नोंदणीसंदर्भात अनेक कट-ऑफ तारखांवर भर देत होता.

कायदा तथा न्याय मंत्रालयाने नुकतेच, आपला लोक प्रतिनिधित्व अधिनियमातील कलम 14 'बी'मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव असल्याचे संसदेच्या एका समितीला सांगितले होते. यात नोंदणीसाठी दर वर्षी चार कट ऑफ डेट्स, 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै तथा 1 ऑक्टोबरचा समावेश असावा, असे म्हणण्यात आले होते.

'पत्नी' एवजी लिहिले जाणार 'जोडीदार' -या विधेयकात निवडणूक संबंधित कायदा लष्करातील मतदारांच्या बाबतीत लैंगिक दृष्ट्या तटस्थ करण्याची तरतूद आहे. सध्याचा निवडणूक कायदा यात भेदभाव करतो. अर्थात, सध्याच्या कायद्यानुसार, पुरुष सैनिकाच्या पत्नीला सैन्य मतदार म्हणून आपली नाव नोंदणी करण्याची सुविधा आहे. मात्र, महिला सैनिकाच्या पतीला अशी सुविधा नाही. यापार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाकडे शिफारस केली होती, की निवडणूक कायद्यात पत्नी शब्दा ऐवजी जोडीदार म्हणजेच वाइफ ऐवजी स्पाउस शब्दा लिहिण्यात यावा, असे झाल्यास समस्येचे निराकरण होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारParliamentसंसदAdhar Cardआधार कार्डVotingमतदान