शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आता ट्रकचालकांनाही मिळणार गारेगार हवा, केबिनमध्ये एसी सक्तीचा, गडकरींची घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 09:51 IST

एका कार्यक्रमात बाेलताना गडकरी यांनी सांगितले की, या कार्यक्रमात सहभागी हाेण्यापूर्वी मी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली आहे.

नवी दिल्ली : ट्रक उत्पादक कंपन्यांना लवकरच चालक कॅबिनमध्ये माेठे बदल करावे लागणार आहेत. २०२५ पासून ट्रकच्या चालक कॅबिनमध्ये एसी बंधनकारक करण्यात येणार असल्याची घाेषणा केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. एका कार्यक्रमात बाेलताना गडकरी यांनी सांगितले की, या कार्यक्रमात सहभागी हाेण्यापूर्वी मी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली आहे.

मी  मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून ट्रकच्या केबिनमध्ये एसी बंधनकारक कराण्याची इच्छा हाेती. मात्र, उत्पादनाचा खर्च वाढेल, याबाबत कंपन्यांची तक्रार हाेती.  लांबच्या प्रवासादरम्यान ट्रकचालकांच्या आराेग्यावर हाेणारा परिणाम कमी करणे आणि अपघात घटविण्याच्या दृष्टीकाेनातून हा निर्णय घेतला आहे, असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर केली नाही. मात्र, २०२५ पासून ट्रकच्या केबिनमध्ये एसी दिसू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

निर्णय कशामुळे?ट्रकचालकांना कधी अतिशय गर्मी तर कधी कडाक्याची थंडी, असे वातावरणही त्यांना सहन करावे लागते.  कधी तापमान ४५-४७ अंश असते. याचा विचार करायला हवा. ट्रक चालविताना त्यांना सुखद अनुभूती मिळायला हवी, जेणेकरून त्यांचे आराेग्य चांगले राहील, असे गडकरी म्हणाले.

 ट्रकचालकांवर ताण देशात ट्रकचालकांचा तुडवडा असून त्यांना एका दिवसात १४-१६ तास ट्रक चालवावा लागताे, याकडे गडकरींनी लक्ष वेधले. ते म्हणाले, इतर देशांमध्ये ट्रकचालकांच्या कामाच्या तासांवर निर्बंध आहेत. त्यांची काम करण्याची स्थिती आणि मन:स्थिती समजून घेणे आवश्यक असून त्यादृष्टीने काम करावे लागेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी