शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आता राजकारणात संघर्ष , रजनीकांत यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:54 IST

तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय स्थितीही अस्थिर झालेली असताना रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

चेन्नई : तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय स्थितीही अस्थिर झालेली असताना रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. दक्षिणेतील दोन स्टार रजनीकांत व कमल हसन यांच्यात चित्रपटात असणारी स्पर्धा आता राजकारणात पहायला मिळेल.मागे वळून पाहिले तर, रजनीकांत आणि कमल हसन यांच्यातील ही स्पर्धा स्पष्ट दिसते. मद्रासमध्ये (आता चेन्नई) फिल्म इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रजनीकांत बालाचंदर यांच्याकडे गेले आणि चित्रपटात काही संधी मिळते काय याचा शोध सुरु केला. कमल हसन यांनी एका कार्यक्रमात या आठवणी सांगितल्या होत्या. कमल हसन म्हणाले होते की, बालाचंदर यांच्या कार्यालयात छोट्या खिडकीतून मी एका व्यक्तीला विचारले की, आपण पुणे इन्स्टिट्यूटमधून आला आहात काय? तर तो तरुण म्हणाला की नाही, मी मद्रास इन्स्टिट्यूटमधून आलो आहे. तो व्यक्ती होती रजनीकांत. बालचंदर यांनी रजनीकांत यांना पसंती दिली आणि तेव्हापासून कमल हसन यांना एक प्रतिस्पर्धी तयार होण्यास सुरुवात झाली. १९७५ मध्ये रजनीकांत यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात केली. १९७८ मध्ये त्यांना चित्रपटात प्रमुख भूमिका मिळू लागल्या.कमल हसन हे बुद्धीप्रामाण्यवादी तर, रजनीकांत हे देवावर प्रचंड श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व. काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी केशरी हा आपला रंग नसल्याचे सांगत आपला भविष्यातील प्रवास कसा असेल याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांची भाजपशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. नोटाबंदीनंतर रजनीकांत यांनी मोदी यांची प्रशंसा केली होती. राजकारणातील आपली नवी इनिंग सुरु करणाºया कमल हसन आणि रजनीकांत यांनी स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करणारे सरकार देण्याचे वचन दिले आहे. मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी आपल्या समर्थकांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, तुम्ही मला खूप पैसा आणि प्रसिद्धी दिली आहे. मला अपेक्षाही नव्हती एवढे तुम्ही मला प्रेम दिले आहे. पैसा आणि प्रसिद्धीसाठी मी राजकारणात येत नाहीय. मला सत्तेची इच्छाही नाही. १९९६ मध्ये मला तशी संधी आली होती. पण, मी ही संधी नाकारली. त्यावेळी मी ४५ वर्षांचा होतो. आता ६८ वर्षांचा असताना मी अशी इच्छा कशाला बाळगू?हो नाही करता करता सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणाचा मार्ग निवडला आहे. रजनीकांत यांनी १९९५ मध्ये प्रथम राजकारणावर भाष्य करत स्पष्ट केले होते की, मला राजकारणात रस नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे प्रसिद्धी आणि पैसा आहे.मात्र, एक वर्षातच १९९६ मध्ये रजनीकांत यांनी द्रमुकचे समर्थन केले आणि स्पष्ट केले की, जर जयललिता सत्तेत परत आल्या तर, देवही तामिळनाडूला वाचवू शकत नाही.आठ वर्षांनंतर रजनीकांत अण्णाद्रमुक- भाजपला समर्थन देण्यासाठी पुढे आले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील भाजप आघाडीसाठी मी मतदान करणार आहे. पण, मी तुम्हाला असे करण्याचाआग्रह करणार नाही, असे त्यांनीस्पष्ट केले होते.कमल हसन, अमिताभसह मान्यवरांच्या शुभेच्छाबॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांच्यासह अनेक दिग्गजांनी रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. कमल हसन यांनी पोस्ट केले आहे की, रजनीकांत यांनी स्वीकारलेली सामाजिक जबाबदारी आणि राजकारण प्रवेशाचे मी स्वागत करत आहे.अमिताभ बच्चन यांनी व्टिट केले आहे की, माझा मित्र, माझा सहकारी आणि एक विनम्र व्यक्ती रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या यशस्वीतेसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. काँग्रेस प्रवक्त्या खुशबू सुंदर यांनी व्टिट केले आहे की, आम्हाला याची जाणीव आहे की, लोकशाही आणि विकासावर रजनीकांत हे विश्वास ठेवतात. त्यांच्या प्रयत्नांसाठी आमच्या शुभेच्छा.भाजपने रजनीकांत यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे की, रजनीकांत यांचे पक्षात प्रवेशासाठी स्वागत आहे. दक्षिणेत पक्षाच्या विस्तारासाठी भाजप अनेक दिवसांपासून रजनीकांत यांना गळ लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत महिन्यात चेन्नई दौºयात रजनीकांत यांच्याशी चर्चाकेली होती.आम्हाला आव्हान नाही : अण्णाद्रमुक, द्रमुकरजनीकांत यांचा राजकीय प्रवेश तामिळनाडूच्या राजकारणात एखाद्या भूकंपापेक्षा निश्चितच कमी नाही. सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांनी मात्र रजनीकांत हे आमच्यासाठी आव्हान नसल्याचे सूरात सूर लावत सांगितले आहे. अण्णाद्रमुकचे मंत्री जयकुमार म्हणाले की, आमचा पक्ष मजबूत आहे. आमच्यावर याचा परिणाम होणार नाही. द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, रजनीकांत यांचे मी अभिनंदन करतो. आपल्या समर्थकांची प्रतीक्षा त्यांनी संपविली आहे. मात्र, द्रमुकसाठी याचा कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होणार नाही.२०१४ नंतर रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. पण, राजकारणात जावे की, नाही याबाबत रजनीकांत यांचा संभ्रम कायम राहिला.अखेर रविवारी रजनीकांत यांनी ती घोषणा केली ज्याची प्रतीक्षा त्यांचे समर्थक अनेक वर्षांपासून करत होते.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारण