शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आता चेहरा दाखवा, प्रवास करा; डिजीयात्रा ॲप झाले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 12:08 IST

डिजीयात्रा ॲप झाले सुरू, विमानतळावरील प्रवेश प्रक्रिया होणार सुलभ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विमानप्रवास करण्यापूर्वीची प्रक्रिया अधिक सोयीस्कर व्हावी, यासाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांसाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने गुरुवारी ‘डिजीयात्रा’ हे ॲप सुरू केले आहे. या ॲपमुळे विमान प्रवासासाठी प्रवाशाचा चेहरा हाच त्याचा बोर्डिंग पास ठरणार आहे. नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हे ॲप लाँच केले. 

विमानतळावरील प्रत्येक चेक पॉइंटवर चेहऱ्याच्या आधारे प्रवाशांची ओळख पटल्यानंतर प्रवेश मिळेल. विमानतळावरील प्रवेश, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग या तीन ठिकाणी ॲपद्वारे ओळख पटविण्यात येईल. यामुळे सुरक्षा यंत्रणा चोख होईल आणि खऱ्या प्रवाशालाच प्रवेश मिळेल.

कशी पटते ओळख?ही एक बायाेमेट्रिक यंत्रणा आहे. चेहरा, डाेळे आणि ओठांच्या ठेवणीवरुन व्यक्तीची ओळख पटविण्यात येते. nहे तिन्ही घटक स्कॅनरद्वारे रीड केले जातात. त्यातून चेहऱ्याची एक ३डी प्रतिमा तयार हाेते. ती एका डेटाबेसमध्ये साठविली जाते. या तंत्रज्ञानाचा शाेध अमेरिकेतील तज्ज्ञांनी लावला हाेता.

डिजीयात्रा ॲपचा उद्देशnविमानतळावरील लांबच लांब रांगांपासून मुक्ती मिळविणे.nकागदपत्रे आणि हार्ड कॉपी यांपासून मुक्ती मिळविणे.n‘नो फ्लायर लिस्ट’मधील प्रवाशांना ओळखणे होणार आणखी सोपे.

असे वापरले जाणार डिजीयात्रा ॲप

nॲप डाउनलोड करून सर्व तपशील भरा.nओटीपीद्वारे एकदा पडताळणी केल्यानंतर ॲप वापरास तयार होईल.nजेव्हा-जेव्हा प्रवास कराल, तेव्हा वेब चेक-इन करून तिकीट ॲपवर अपलोड करावे लागेल.nएअरपोर्टवर गेल्यावर ॲप स्कॅनरवर ठेवून चेहरा स्कॅन केला की प्रवेश होईल.nदुसऱ्या टप्प्यात सुरक्षेसाठी चेहरा स्कॅन करावा लागेल.nविमानात चढतानाच चेहरा स्कॅन होईल.

पहिल्या टप्प्यात या ठिकाणी अंमलबजावणीया ॲपची अंमलबजावणी सर्वप्रथम दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी येथे होईल. मार्च २०२३ पासून दुसऱ्या टप्प्यात गया, विजयवाडा, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे येथे ॲपची अंमलबजावणी होईल. तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण देशात ते लागू केले जाईल. सुविधा देऊन संपूर्ण प्रक्रिया कागदविहीन करणे हा या ॲपचा उद्देश आहे.

टॅग्स :digitalडिजिटलpassengerप्रवासीAirportविमानतळ