शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

आता रशियन हेलिकॉप्टर भारतातून होणार हद्दपार; DRDO आणि HL करणार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 10:58 IST

दशकभरात होणार प्रक्रिया, ‘एचएएल’ची निर्मिती

नवी दिल्ली : भारत आता शस्त्रास्त्रांच्या बाबतीत इतर देशांवरील अवलंबित्व कमी करत आहे. त्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि डीआरडीओ यांचा हात आहे. रशियन एमआय-१७ची जागा घेण्यासाठी भारताकडे येत्या ८ ते १० वर्षांत स्वदेशी मध्यम - उड्डाण क्षमता असलेले हेलिकॉप्टर घेण्याची शक्यता आहे.

एचएएलचे मुख्य व्यवस्थापक (डिझाइन) एरोडायनॅमिक्स अब्दुल रशीद ताजर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, भविष्यातील १३ टन भारतीय बहुविध हेलिकॉप्टरची (आयएमआरएच) प्राथमिक रचना आधीच सुरू केले आहे. आम्ही निधीची वाट पाहत आहोत. संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीच्या मंजुरीनंतर चार वर्षांच्या आत आम्ही प्रतिकृतीच्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज होऊ आणि पुढील चार वर्षांत चाचणी प्रमाणपत्र प्राप्त करू. भारतीय हवाई दलात आठ वर्षांनंतर समावेशासाठी ते तयार असतील आणि हळूहळू ते रशियन एमआय-१७ ची जागा घेतील. 

देशातील स्वदेशी मध्यम उड्डाण क्षमतेचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या वाहतूक ताफ्यातील उणीव भरून काढेल. भारतीय वायुसेनेकडे सध्या सुमारे २५० एमआय-१७ हेलिकॉप्टर आहेत. प्रत्येक हेलिकॉप्टर ३०हून अधिक सैनिक आणि अनेक शस्त्रे वाहून नेऊ शकते. आयएमआरएच हवाई हल्ला, हवाई वाहतूक, लढाऊ रसद, लढाऊ शोध आणि बचावकार्यासाठी सक्षम असेल. ते ४,५०० किलोपर्यंतचा भार वाहून नेण्यास सक्षम

३०० कोटींना हेलिकॉप्टरहेलिकॉप्टरचे इंजिन फ्रान्सचे सॅफ्रान हेलिकॉप्टर इंजिन आणि एचएएलतर्फे संयुक्तपणे विकसित केले जाईल. एरो इंडिया प्रदर्शनादरम्यान यासंदर्भात करार केला. प्रत्येक हेलिकॉप्टरची किंमत ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे व एचएएलला किमान ५०० पेक्षा जास्त हेलिकॉप्टरची ऑर्डर अपेक्षित आहे.

टॅग्स :airforceहवाईदल