शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता मुडीजनेही जीडीपीचा अंदाज घटवला; कर्जाचा बोजा वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:18 IST

मुडीजच्या अहवालानुसार जर अर्थव्यवस्थेमध्ये अशीच सुस्ती राहिली तर याचे गंभीर परिणाम होतील.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेनंतर आता रेटिंग देणारी एजन्सी मुडीजने आर्थिक वर्ष 2019-20 साठीचा विकास दर 5.8 टक्के केला आहे. यापूर्वी 6.2 टक्के अंदाज वर्तविण्यात आला होता. आरबीआयने याआधीच चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.8 वरून 6.1 टक्के वर्तविला आहे. 

मुडीजच्या ताज्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये विकास दर वाढून 6.6 टक्के होण्याची शक्यता आहे. तर येणाऱ्या काही वर्षांत विकास दर 7 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारताचा विकासदर 8 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता होती. मात्र, गुंतवणुकीवर आधारित सुस्तीमुळे कमजोर झाला आहे. याशिवाय मागणीमध्ये झालेली घट, ग्रामीण घरांवर आलेला आर्थिक दबाव, वाढलेला बेरोजगारी दर आणि वित्त संस्थांकडील निधीची चणचण आदी समस्यांचा गंभीर प्रभाव पडलेला आहे. 

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग कमी होऊन 5 टक्क्यांवर आलेला आहे. हा गेल्या सहा वर्षांतील निच्चांकी पातळीवरचा दर आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेनेही विकास दराचा अंदाज घटवून 6.8 टक्क्यांवरून 6.1 टक्के केला आहे. 

कर्जाचा बोजा वाढणार मुडीजच्या अहवालानुसार जर अर्थव्यवस्थेमध्ये अशीच सुस्ती राहिली तर याचे गंभीर परिणाम होतील. यामुळे महसूलातील तूट कमी करण्याच्या प्रयत्नांना झटका बसणार आहे. तसेच कर्जाचा बोजाही वाढणार आहे. सरकारने नुकताच कार्पोरेट कर कमी करण्याची घोषणा केली होती. यामुळेच वर्षाला 1.5 लाख कोटींचा बोजा पडणार आहे.

 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक