शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बँक खातं उघडण्यासाठी आता आधार अनिवार्य- केंद्र सरकार

By admin | Updated: June 16, 2017 16:48 IST

गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं आधार कार्ड सक्तीचं करण्याच्या सूचना केल्या होत्या.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं आधार कार्ड सक्तीचं करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसारच आतापासून नवे बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. ज्यांनी आतापर्यंत बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं नाही, त्यांनाही केंद्र सरकारनं अंतिम मुदत दिली आहे. त्याप्रमाणेच 50 हजारांहून अधिकची रक्कम बँकेत जमा करण्यासाठीही आता आधार कार्ड लागणार आहे. सर्व खातेधारकांना 31 डिसेंबर 2017पर्यंत आधार कार्ड नंबर बँकेत जमा करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. तसं न केल्यास खातं बंद होण्याचीही शक्यता आहे. देशभरात कोटींहून अधिक लोकांचे आधार कार्ड आतापर्यंत तयार झाले आहेत. जवळपास देशातल्या 80 टक्के जनतेकडे आधार कार्ड आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा(यूआईडीएआई)ने आतापर्यंत अब्जांहून अधिक आधार कार्ड दिले आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. प्रसाद म्हणाले, देशातील 100 कोटींहून अधिक निवासी नागरिक आधारअंतर्गत नोंदणीकृत आहेत. आधारच्या माध्यमातून गरिबांपर्यंतही पोहोचता येऊ शकते. 

आधार कायदा २0१६नुसार आधार कार्ड मिळण्यास जे पात्र आहेत, अशांनाच प्राप्तिकर विवरणपत्रात आधार क्रमांक नोंदविण्याचे बंधन आहे. या कायद्यानुसार वित्तीय आणि अन्य स्वरूपाची सबसिडी, लाभ आणि सेवा घेणाऱ्यांना आधार कार्ड काढण्याचा हक्क आहे. आधार कायद्यानुसार, जे लोक भारताचे निवासी आहेत, त्यांना आधार कार्ड मिळू शकते. 12 महिन्यांच्या काळापैकी 182 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जे लोक भारतात राहिले आहेत, त्या सर्व लोकांना आधार क्रमांक मिळवण्याचा अधिकार आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139 अ अन्वये जे लोक भारताचे निवासी नाहीत, त्यांना विवरणपत्रासोबत आधार क्रमांक देण्याची गरज नाही. याशिवाय आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालय यांनाही पॅन-आधार जोडणीतून सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जे नागरिक 80 वर्षांपेक्षा जास्त ज्येष्ठ आहेत, त्यांना ही जोडणी बंधनकारक नाही.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार-पॅन जोडी बंधनकारक असणाऱ्यांसाठी प्राप्तिकर विभागाने एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशिष्ट नमुन्यात 567678 आणि 56161 या क्रमांकावर आधार क्रमांक एसएमएस केल्यास पॅन क्रमांकाला आधार जोडला जाईल, असे प्राप्तिकर विभागाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.