शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

आता टोमॅटो करा बँकेत डिपॉझिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 08:44 IST

टोमॅटोच्या वाढलेल्या या किंमतीचा काँग्रेस पक्षाकडून निषेध केला जात असून त्यासाठी लखनऊ काँग्रेसने खास युक्ती शोधून काढली आहे.

ठळक मुद्देटोमॅटोच्या वाढलेल्या या किंमतीचा काँग्रेस पक्षाकडून निषेध केला जात असून त्यासाठी लखनऊ काँग्रेसने खास युक्ती शोधून काढली आहे. . सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण देण्यासाठी लखनऊ काँग्रेसने 'टोमॅटो बँक' सुरू केली आहेटोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत लखनऊ काँग्रेसने शहरात 'स्टेट बँक ऑफ टोमॅटो' ही बँक सुरू केली आहे.

लखनऊ, दि. 3- गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दराचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे. इतकंच नाही, तर टॉमेटो विकत घेणं परवडत नसल्याने अनेकांनी आहारातूनही टोमॅटो वगळल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने तसंच वाढलेल्या टोमॅटोच्या दरांमुळे अनेक ठिकाणी टोमॅटोचे ट्रक चोरीला गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या या किंमतीचा काँग्रेस पक्षाकडून निषेध केला जात असून त्यासाठी लखनऊ काँग्रेसने खास युक्ती शोधून काढली आहे. सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण देण्यासाठी लखनऊ काँग्रेसने 'टोमॅटो बँक' सुरू केली आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत लखनऊ काँग्रेसने शहरात 'स्टेट बँक ऑफ टोमॅटो' ही बँक सुरू केली आहे. एखाद्या बँकेमध्ये जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा या बँकेतही ग्राहकांना मिळणार आहेत. फक्त या बँकेत कोणतीही गोष्ट टोमॅटोशी निगडीत असावी लागणार आहे. या बँकेत ग्राहकांना टोमॅटोवर फिक्स डीपॉझिट करता येणार आहे तसंच लॉकर आणि कर्जसुद्धा टोमॅटोवर मिळणार आहे. काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या या बँकेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बँकेच्या बाहेर लोकांच्या लांब रांगा लावल्या आहेत. घरातून टोमॅटो चोरीला जातील या भीतीने लोक त्यांच्या टोमॅटो बँकेत डिपॉझिट करण्यासाठी येत आहेत. या रांगेमध्ये एक 103 वर्षांचा वृद्ध व्यक्तीही होता. टोमॅटो बँकेत डिपॉझिट करावे लागण्याची वेळ येऊ शकते असं कधीही वाटलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी अर्धा किलो टोमॅटो आता बँकेत डिपॉझिट केले आहेत. बँकेच्या नियमानुसार मला सहा महिन्यांनी एक किलो टोमॅटो मिळणार आहेत, असं त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं. 

लखनऊ काँग्रेसच्या सदस्यांकडून ही बँक चालविली जाते आहे. या बँकेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. जर असाच प्रतिसाद राहिला तर आम्हाला अजून शाखा उघडाव्या लागतील, असं मत त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.  देशाच्या अनेक भागात टोमॅटो 100 ते 120 रूपये किलो दराने विकले जात आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत टोमॅटोचे दर असेच वाढलेले राहतील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 

या आहेत टोमॅटो बँकेच्या योजना- बँकेत टोमॅटो डिपॉझिट केल्यास सहा महिन्यांनी पाच पट टोमॅटो मिळणार.- टोमॅटो ठेवण्यासाठी बँकेत लॉकर सुविधा उपलब्ध.- टोमॅटोवर 80 टक्के कर्ज मिळणार.- गरिबांनी बँकेत टोमॅटो जमा केल्यास त्यांना आकर्षक व्याज दर मिळणार.