शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आता सेवा शुल्क भरणं ग्राहकांच्या मर्जीवर

By admin | Updated: January 2, 2017 19:55 IST

हॉ़टेल, रेस्टॉ़रंटमध्ये ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - हॉ़टेल, रेस्टॉ़रंटमध्ये ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाशुल्क भरणे ग्राहकांसाठी ऐच्छिक असल्याचे केंद्रीय ग्राहकविषयक  खात्याने सांगितले आहे. त्यामुळे यापुढे हॉटेलमध्ये सेवाशुल्क भरणे हे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून असेल. 
याबाबत केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की,  अनेक हॉटेल, रेस्टॉरंटमधून मनमानी पद्धतीने सॆवाशुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही ठिकाणी टिप म्हणून  5 ते 20 टक्के रक्कम सेवाशुल्क म्हणून आकारली जात आहे. तसेच ही रक्कम भरण्यासाठी ग्राहकांवर जबरदस्ती केली जात आहे, जिचा सेवेशी काहीही संबंध नाही.    ग्राहक संरक्षण कायदा (1986) नुसार कुठलेही सामान, वस्तू किंवा सेवा पुरवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबणे चुकीचे समजले जाते. तसेच त्यासंदर्भात तक्रारही करता येत होती. मात्र हा नियम सर्वसामान्य ग्राहकांना माहित नसल्याने हॉटेलमालकांकडून मनमानी पद्धतीने सेवाशुल्क आकारले जात होते. 
 दरम्यान, तक्रारी आल्यानंतर ग्राहक मंत्रालयाने हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडे स्पष्टिकरण मागितले होते. त्याला उत्तर देताना या संघटनेने सेवाशुल्क भरणे हे पूर्णपणे ग्राहकाच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे सांगितले. तसेच जर ग्राहक मिळालेल्या सेवेबाबत असमाधानी असेल, तर तो बिलातून सेवा शुल्क पूर्णपणे हटवू शकतो, असेही हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या उत्तरात म्हले होते. त्यानंतर ग्राहक न्यायालयाने कुठलेही हॉटेल ग्राहकांवर सेवाशुल्कासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. तसेच आपल्या प्रदेशातील कंपन्या, हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना सूचित करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले.