नवी दिल्ली: देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर मल्टी-लेन फ्री फ्लो टोल प्रणाली आणि एआय आधारित महामार्ग व्यवस्थापन २०२६ अखेर पूर्णपणे अंमलात येणार असून, यामुळे टोल नाक्यांवरील प्रतीक्षा पूर्णतः संपेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. टोल चोरी थांबेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होईल, असेहे ते म्हणाले.
यात नंबर प्लेट ओळख, उपग्रह तंत्रज्ञान आणि फास्टॅग यांच्या एकत्रित वापरातून टोल संकलन केले जाईल. परिणामी वाहनांना टोलवर थांबावे लागणार नाही. पूर्वी टोल भरण्यास ३ ते १० मिनिटे लागत. फास्टंगमुळे हा वेळ ६० सेकंदांपर्यंत आला. मल्टी-लेन फ्री फ्लो टोलनं वाहनांना कमाल ८० किमी प्रतितास वेगाने टोल पार करता येईल आणि कुणालाही थांबवले जाणार नाही.
महाराष्ट्रातील टोल वसुली किती?
२०२०-२१ - २५९०.८५ कोटी२०२१-२२ - ३३८६.२१ कोटी२०२२-२३ - ४६६०.२१ कोटी२०२३-२४ - ५३५२.५३ कोटी२०२४-२५ - ५११५.३८ कोटी
सरकारला फायदा काय?
- ६,००० कोटी रुपयांचा सरकारी महसूल वाढणे अपेक्षित- १,५०० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत यामुळे होईल.
"टोलवरील वेळ शून्य मिनिटांपर्यंत आणण्याचा आमचा उद्देश आहे. २०२६ पर्यंत हे काम १०० टक्के पूर्ण केले जाईल. केंद्राची जबाबदारी राष्ट्रीय महामार्गापुरती आहे. राज्य महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांवरील समस्या अनेकदा सोशल मीडियावर राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्या जातात, परंतु त्या केंद्राच्या अखत्यारित येत नाहीत."- नितीन गडकरी, केंद्रीय महामार्ग मंत्री
Web Summary : Toll plazas to vanish by 2026 with AI-driven system, says Gadkari. Vehicles can pass at 80 kmph. Toll theft will end, boosting revenue, saving fuel and reducing wait times at toll booths.
Web Summary : गडकरी ने कहा, एआई-संचालित प्रणाली के साथ 2026 तक टोल प्लाजा गायब हो जाएंगे। वाहन 80 किमी प्रति घंटे की गति से गुजर सकेंगे। टोल चोरी खत्म होगी, राजस्व बढ़ेगा, ईंधन की बचत होगी और टोल बूथों पर प्रतीक्षा समय कम होगा।