शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सनी देओल यांची खासदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 15:32 IST

निवडणूक आयोगानुसार आरपी १९५१ च्या कलम ७७ नुसार उमेदवाराने निर्धारित रक्कमेपेक्षा अधिक खर्च करून ती माहिती लपविल्यास संबंधित विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्यात येते.

नवी दिल्ली - पंजाबमधील गुरुदासपूरमधून विजय मिळविणारे अभिनेता सनी देओल यांची लोकसभेची खासदारी धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा उमेदवारासाठी निवडणुकीत ७० लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून दिली आहे. मात्र ही मर्यादा उमेदवाराने पाळली नसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते. तर कधी विजयी खासदारचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात येते. भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सनी देओल यांच्या बाबतीत असच काहीस झालं आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारीने ७० लाखांहून अधिक खर्च केल्याचे समोर आल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येते. गुरुदासपूरमधून विजय झालेल्या सनी देओल यांनी निवडणुकीत ८६ लाख रुपये खर्च केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांनी सनी देओल यांच्याकडे निवडणूक खर्चाचा तपशील मागितला आहे.

दुसरीकडे सनी देओल यांच्या वकिलाने म्हटले की, निवडणूक आयोगाच्या टीमकडून हिशोब करण्यात चूक झाली असून निवडणूक आयोगच्या टीमकडून सर्व चौकशी झाल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर येणारच आहे.

गुरुदासपूर मतदार संघातू दुसऱ्या स्थानी असलेल्या काँग्रेसच्या सुनील जाखड यांनी ६३ लाख रुपये खर्च केले आहेत. तर आपचे उमेदवार पीटर मसीह यांनी सात लाख ६५ हजार रुपये खर्च केले असून लालचंद कटारुचक्क यांनी ९ लाख ६२ हजार रुपये निवडणूक प्रचारात खर्च केले आहेत.

खर्च लपविल्यास सदस्यता होते रद्द

निवडणूक आयोगानुसार आरपी १९५१ च्या कलम ७७ नुसार उमेदवाराने निर्धारित रक्कमेपेक्षा अधिक खर्च करून ती माहिती लपविल्यास संबंधित विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्यात येते. त्यावर सुनील जाखड यांनी म्हटले की, सनी देओल यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द करावे.