शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

केंब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीला केंद्र सरकारने पाठविली नोटीस; सहा प्रश्नांबाबत मागविला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:37 IST

फेसबुकच्या माध्यमातून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतरित्या मिळवल्याच्या प्रकरणात वादात अडकलेल्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका या ब्रिटिश राजयकीय डेटा विश्लेषक कंपनीने भारतीयांचीही माहिती मिळवल्याचा संशय आहे. त्यामुळे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्या कंपनीला नोटीस पाठवली आहे.

नवी दिल्ली : फेसबुकच्या माध्यमातून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतरित्या मिळवल्याच्या प्रकरणात वादात अडकलेल्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका या ब्रिटिश राजयकीय डेटा विश्लेषक कंपनीने भारतीयांचीही माहिती मिळवल्याचा संशय आहे. त्यामुळे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्या कंपनीला नोटीस पाठवली आहे.तुमच्याकडून भारतीयांची माहिती कोणी मिळवली वा मिळवत आहे आणि ही माहिती मिळवण्यापूर्वी संबंधित भारतीयांची परवानगी घेतली होती का, आदी प्रश्न केंद्र सरकारने या कंपनीला विचारले आहेत.केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी ही नोटीस केंब्रिज अ‍ॅनालिटिकाला पाठवली. २३ मार्च २०१८ रोजी केंब्रिज अनॅलिटिकाला ही नोटीस पाठवली आहे. या नोटिशीतकंपनीकडून सहा प्रश्नांची उत्तरे मागवली असून, ती ३१ मार्चपर्यंत द्यावीत, असेही कळवले आहे. प्रश्नांची उत्तरे न दिल्यास तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे कंपनीला कळवण्यात आले आहे.फेसबुक युजर्सनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये असे आवाहन माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीयांना केले आहे. आपले राहण्याचे व कामाचे ठिकाण, नोकरीची माहिती, राजकीय मते तसेच स्वत:ची ओळख पटवणारी अन्य कोणतीही माहिती फेसबुक वा सोशल मीडियावर ठेवू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.भारतीयांच्या माहितीचा वापर करण्यामध्ये कंपनीचा सहभाग आहे का? तुमच्याद्वारे भारतीयांची माहिती मिळवणारे कोणकोण आहेत, अन्य कोणत्या कंपनीनेही माहिती मिळवली असेल तर ती कशी मिळवली, माहिती मिळवण्यासाठी संबंधित भारतीयांची संमती घेण्यात आली होती का, या लोकांची माहिती कंपनीपर्यंत कशी आली आणि मिळवलेल्या माहितीद्वारे नवी प्रोफाइल्स तयार केली आहेत का, असे प्रश्नही या पत्राद्वारे विचारण्यात आले आहेत.लंडनमध्ये छापे!लंडन : फेसबुक डेटाचोरीमुळे वादात सापडलेल्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका (सीए)च्या लंडनमधील कार्यालयांवर ब्रिटिश नियमकांच्या वतीने शुक्रवारी छापे घालण्यात आले. माहिती आयुक्तांच्या कार्यालयातील १८ एजंटांनी कंपनीच्या मुख्यालयात रात्री प्रवेश केला. मध्यरात्रीपर्यंत तिथे तपासणी सुरू होती.लंडनच्या उच्च न्यायालयाने कंपनीविरुद्धसर्च वॉरंटला परवानगी दिली होती. केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने राजकीय हेतूने फेसबुक डेटा बेकायदेशीररीत्या मिळविला असावा, असा संशय आहे. न्या. जेम्स लिओनार्ड हे या प्रकरणाचा परिपूर्ण निकाल २७ मार्च रोजी देणार आहेत.स्पेस एक्सचे फेसबुक पेज डिलीटन्यूयॉर्क : डेटा चोरीमुळे सर्व स्तरांतून टीका होत असताना, प्रख्यात उद्योजक एलॉन मस्क आपली 'स्पेस एक्स' ही रॉकेट कंपनी आणि टेस्ला ही कार कंपनी यांचे फेसबुक अकाउंट डिलीट केले आहे. यामुळे अनेकांना मोठाच धक्का बसला आहे.फेसबुक पेज नसल्याचा आमच्या कंपन्यांना अजिबात फटका बसणार नाही. फेसबुक पेज नसल्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे मस्क यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Cambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाFacebookफेसबुक