शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

'ती' पावलं 'येती' हिममानवाची नाहीत; नेपाळच्या सैन्यानं शोधलं ठशांमागचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 13:27 IST

ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे.

नवी दिल्लीः लोककथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यानं भारतीय लष्कराचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहण पथकाला 9 एप्रिल 2019 रोजी मकालु बेसकॅम्पच्या परिसरात ‘येती’ या पौराणिक प्राण्याच्या पावलांचे 32 इंच लांब आणि 15 इंच रुंद अशा आकाराचे रहस्यमय ठसे आढळले. परंतु भारतीय लष्कराचा हा दावा नेपाळच्या सैन्याच्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावला आहे. नेपाळ सैन्याच्या मते, अशा प्रकारची पावलं वारंवार त्या क्षेत्रात दिसत असतात. ती पावलं जंगली अस्वलाची असल्याचा खुलासाही नेपाळच्या सैन्यानं केला. भारतीय लष्कराला येतीच्या पाऊलखुणा दिसल्यापासून आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. तसेच खरंच का ती येतीची पावलं आहेत हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केला. परंतु स्थानिक आणि आमच्या तज्ज्ञांच्या मते ती पावलं जंगली अस्वलाची आहेत, असं नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल बिग्यान देव पांडे यांनी सांगितलं आहे. आख्यायिका आणि वास्तवकपी कुळातील ‘येती’ या रहस्यमय प्राण्याच्या अनेक आख्यायिका नेपाळी लोककथांमध्ये सांगितल्या जातात. त्यानुसार, या ‘हिममानवा’चे वास्तव्य हिमालयात, मध्य आशियात व सैबेरियात आहे. त्याचे वर्णन रानटी, केसाळ प्राणी असे केलेले आढळते.‘येती’चा अनेक शतके शोध1920च्या दशकात हिमालयात गेलेल्या सर एडमंड हिलरी यांच्यासह इतरही गिर्यारोहकांनी यात रस घ्यायला सुरुवात केली. 1950च्या दशकात एव्हरेस्ट शिखरावर जाण्याचा पर्यायी मार्ग शोधत असताना, बर्फामध्ये पावलांचे अजब ठसे पाहिल्याचा दावा एरिक शिप्टन या ब्रिटिश गिर्यारोहकाने केला व ‘येती’चा शोध घेण्यात अधिक स्वारस्य निर्माण झाले.‘यती’ला पकडण्यासाठी 1950च्या दशकात नेपाळ सरकारने शिकारीचा रीतसर परावानाही जारी केला होता. 2008मध्ये पश्चिम नेपाळमधील एका पर्वतावरून परत येणा-या जपानी गिर्यारोहकांनीही ‘यती’च्या पावलांचे ठसे दिसल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडे उत्तम कॅमेरे व दुर्बिणी होत्या, पण त्यांना ‘येती’ कुठे दिसला नव्हता. ‘येती’च्या म्हणून गोळा केलेल्या केस, दात, कातडी व विष्ठेच्या अनेक नमुन्यांची वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय चमुने 2017मध्ये ‘डीएनए’ चाचणी केली, पण ते कुत्र्याच्या दाताचा असल्याचे व इतर सर्व नमुने काळ्या व विटकरी अस्वलांचे असल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNepalनेपाळ