सरळ खतांचा पुरवठा ४५ टक्केही नाही रब्बी हंगाम : डीएपी वगळता मिश्र खतांचा पुरवठाच नाही
By admin | Updated: November 19, 2015 00:09 IST
जळगाव- रब्बी हंगामाची पेरणी ५० टक्क्यांवर झाली आहे, पण सरळ खतांचा म्हणजेच पोटॅश, फॉस्फेट व युरीया पुरवठा अद्याप ४५ टक्क्यांखाली आहे. याच वेळी डाय अमोनिअम फॉस्फेट वगळता इतर मिश्र खतांचा पुरवठाच रब्बी हंगामासाठी होणार नाही, असे कृषि विभागाने म्हटले आहे. खरीप हंगामासाठी आलेली मिश्र खते दुष्काळी स्थितीमुळे पडून असल्याने मिश्र खते मागविण्यात आलेली नसल्याचे स्पष्टीकरण कृषि विभागाने दिले आहे.
सरळ खतांचा पुरवठा ४५ टक्केही नाही रब्बी हंगाम : डीएपी वगळता मिश्र खतांचा पुरवठाच नाही
जळगाव- रब्बी हंगामाची पेरणी ५० टक्क्यांवर झाली आहे, पण सरळ खतांचा म्हणजेच पोटॅश, फॉस्फेट व युरीया पुरवठा अद्याप ४५ टक्क्यांखाली आहे. याच वेळी डाय अमोनिअम फॉस्फेट वगळता इतर मिश्र खतांचा पुरवठाच रब्बी हंगामासाठी होणार नाही, असे कृषि विभागाने म्हटले आहे. खरीप हंगामासाठी आलेली मिश्र खते दुष्काळी स्थितीमुळे पडून असल्याने मिश्र खते मागविण्यात आलेली नसल्याचे स्पष्टीकरण कृषि विभागाने दिले आहे. यंदा पावसाळा पुरेसा झाला नाही. अर्धा जिल्हा म्हणजेच पारोळा, धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, जामनेर, बोदवड या तालुक्यांमध्ये स्थिती बिकट बनू लागली आहे. तापी काठावरील गावांमध्ये स्थिती तेवढी बरी आहे. यामुळेे रब्बी हंगामाही फारसा बहरणार नाही हेदेखील स्पष्ट झाले आहे. यंदा रब्बी हंगामाखातील पिकांची एक लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु वीज व पाण्याची उपलब्धता लक्षात घेता फक्त ९० हजार हेक्टरपर्यंत रब्बी पिकांची पेरणी होऊ शकते, असा अंदाज कृषि विभागाने व्यक्त केला आहे. कृषि विभागाने मागणीकडे केले दुर्लक्षरब्बी हंगाम हव्या तेवढ्या क्षेत्रावर फुलणार नाही. यातच खरीप हंगामात आलेली मिश्र खते म्हणजेच १०.२६.२६, १२.३२.१६, २०.२०.०, १६.१६.१६ आदी खतांची मागणीच कृषि विभागाने आयुक्तालयाकडे केली नाही. यामुळे या खतांचा पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. सुपर फॉस्फेटचा फक्त १७ टक्के पुरवठा झाला आहे. कोट-सरळ खतांचा पुरवठा कमी नाही. अपेक्षेनुसार तो होत आहे. परंतु मागील हंगामातील खते मोेठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मिश्र खतांचा कुठलाही तुटवडा नाही. युरीयाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. -मधुकर चौधरी, कृषि विकास अधिकारी, जि.प.विविध खतांचा पुरवठा (पुरवठा मे.टनमध्ये)खताचा प्रकार पुरवठा टक्केवारीयुरीया१३९२७४३सुपर फॉस्फेट२६२५१७पोटॅश४०२८३९डीएपी३३९४८५मिश्र खतांची उपलब्धता(माहिती मे.टनमध्ये)२०.२०.०३०३६१५.१५.१५८१७५१२.३२.१६२०४९१०.२६.२६१३७२५१६.१६.१६४४१२