शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू दहशतवादी नव्हे, तर संघी दहशतवादी- दिग्विजय सिंह

By admin | Updated: June 21, 2017 21:35 IST

हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवादाची सगळीकडेच चर्चा आहे. तत्कालीन यूपीए सरकारवर "हिंदू दहशतवाद" हा शब्द रूढ केल्याचा आरोप हरियाणा सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनिल वीज यांनी केला आहे. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही, असंही अनिल वीज म्हणाले होते. त्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. 2006 ते 2008 या दोन वर्षांच्या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दरगाह आणि मालेगावमधील दोन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये 119 लोकांचा बळी गेला होता. या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये असीमानंद यांचंही नाव पुढे आलं होतं. तसेच या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता.तत्पूर्वी अनिल वीज म्हणाले होते, समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटादरम्यान पाकिस्तानातील जे लोक पकडण्यात आले, त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्याच वेळी हिंदुस्थानातील लोकांना पकडून "हिंदू दहशतवाद" असं नाव देण्यात आलं होतं. काँग्रेस सरकारनं मतांच्या राजकारणासाठी हा खेळ केला होता आणि काँग्रेसच्याच सांगण्यावरून त्यावेळी त्या पाकिस्तानी नागरिकांना सोडण्यात आलं होतं. काँग्रेसला राजकीय पातळीवर भारतात हिंदू दहशतवाद असल्याचं सिद्ध करायचं होतं. मात्र हिंदू कधीच दहशतवादी होऊ शकत नाहीत. जर हिंदू दहशतवादी असते तर पूर्ण जगात दहशतवाद नसता, दहशतवाद एव्हाना संपला असता. अनिल वीज यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ब-याचशा दहशतवादी हल्ल्यात मुस्लिम सामील होण्याच्या कारणास्तव काँग्रेस सरकार हिंदू दहशतवाद समोर आणू पाहत होते, असा आरोपही अनिल वीज यांनी केला आहे.