शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गोरखपूरमधील बीआरडी इस्पितळ नव्हे, ‘मृत्यू’तळच! आॅगस्टमध्ये २९६ बालके दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 02:31 IST

बालकांच्या मृत्यूंमुळे देशभरात कुख्यातीने चर्चेत आलेल्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात आॅगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांनी दिली.

गोरखपूर (उत्तर प्रदेश) : बालकांच्या मृत्यूंमुळे देशभरात कुख्यातीने चर्चेत आलेल्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात आॅगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांनी दिली.मेंदुज्वर रुग्ण कक्षात ८३ आणि नवजात शिशू कक्षातील २१३ बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. याच इस्पितळात मेंदुज्वर, नवजात शिशू आणि बालरुग्ण कक्षात यावर्षी जानेवारीपासून १,२५^^६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही सिंह यांनी दिली.गंभीर आजारी असलेल्या मुलांना नवजात शिशू अति दक्षता कक्षात उपचारासाठी आणले जाते. यात मुदतपूर्वी जन्मलेली, कमी वजनाची, कावीळ आणि अन्य संसर्गजन्य आजारी असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना तर अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी म्हटले आहे.गेल्या २४ तासांत मेंदू ज्वराचे १७ बालकांना या इस्पितळात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला, असे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. पुष्कर आनंद यांनी सांगितले.दरम्यान, बीआरडी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांच्या पत्नीला उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.२०१७ मध्ये १,२५६ जणांचा मृत्यूआॅगस्ट २०१७ मध्ये कोणत्या रुग्ण कक्षात किती बालके दगावली, याचा तपशीलही त्यांनी दिला. २७ आणि २८ आॅगस्ट रोजी ३७ बालकांचा मृत्यू झाला. यापैकी २६ बालक नवजात शिशू आयसीयूत आणि ११ मुले मेंदुज्वर उपचार कक्षात मरण पावली.गोरखपूरच्या या इस्पितळात सातत्याने बालकांचा मृृत्यू होत असल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे. न्यू इंडियात मानवी जीवाला किंमत नाही. भाजपशासित राजस्थान, हरियाणा, झारखंड, छत्तीसगडमध्येही मृत्यूचे तांडव चालू आहे. दोषींना अभय दिले जात आहे, अशा शब्दांत राज बब्बर यांनी निशाणा साधला.

टॅग्स :Gorakhpurगोरखपूरhospitalहॉस्पिटल