शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ईव्हीएम नव्हे तर जनतेमुळेच "आप"ला पराभव - कुमार विश्वास

By admin | Updated: April 28, 2017 15:41 IST

दिल्ली महानगरपालिका निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणा-या आम आदमी पार्टीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणा-या आम आदमी पार्टीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. शिवाय पक्षनेतृत्वाविरोधातही उघड-उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. आता आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले कुमार विश्वास यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. 
आम आदमी पार्टीविरोधी भूमिका घेत विश्वास यांनी म्हटले आहे की, "दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत ईव्हीएमने नाही तर जनतेनं "आप"ला हरवले आहे." 
 
शिवाय केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लोबाल करायला नको होते, असेही विश्वास म्हणाले आहेत. एक वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वास यांनी सांगितले की, पार्टीमध्ये व्यापक बदल करण्यासाठी प्रयत्न करणं गरजे आहे. ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला नाही. तर आम्हाला जनतेचं समर्थन नाही मिळाले. आम्ही आपल्या कार्यकर्त्यांसोबत व्यवस्थित संवाद  साधू शकलो नाहीत". 
 
विश्वास यांनी पार्टीचे निर्णय बंद खोलीत घेतल्याचा आरोप करत सांगितले की, अनेक निर्णय बंद खोलीत झाले.  दिल्ली मनपा निवडणुकीत अयोग्य उमेदवारांना तिकीट देण्यात आले. ईव्हीएममध्ये गोंधळ असणं हा निवडणुकीचा भाग आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. निवडणूक आयोग, कोर्ट आहे जेथे आपण आपले म्हणणे मांडू शकतो. 
 
पुढे ते असेही म्हणाले की, " जंतरमंतरवर ईव्हीएमविरोधात आंदोलन करायचे आहे की भ्रष्टाचार, मोदी आणि काँग्रेसविरोधात लढण्यासाठी आंदोलन करायचे आहे, यातील कोणत्या गोष्टी प्राधान्य द्यायचे आहे हे आम्हाला ठरवावं लागेल."
 
पंजाब, दिल्लीत "आप"चा पराभव झाला आहे. यावर पार्टीला बसून निर्णयाक भूमिका घ्यावी लागेल, असेही विश्वास म्हणालेत.  गोपाल राय यांना दिल्ली आपचे संयोजक पद देण्याबाबत  उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, "गोपाल राय सक्षम व्यक्ती आहेत. पार्टीतून बहुमत मिळाल्याने त्यांना हे पद सोपवण्यात आले. या पदासाठी केवळ राय हेच एकमेव उमेदवार होते अशातला भाग नाही. मात्र बहुमत मिळाल्यानं मीदेखील त्यांच्या नावावर सहमती दर्शवली"
 
दुसरीकडे,"दिल्लीत जे "आप"नं काम केले ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. आम्हाला सुधारणा करणं गरजेचं आहे."
उल्लेखनीय बाब म्हणजे आम आदमी पार्टीच्या कार्यप्रणालीबाबत काही दिवसांपूर्वी विश्वास यांनी एक व्हिडीओ जारी करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकप्रकारे सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता. 
 
दरम्यान, हे प्रकरण आणखी चिघळू नये यासाठी केजरीवाल यांनी व्हिडीओची प्रशंसा करत पार्टीतील अन्य आमदारांनाही पाहण्यास सांगितले. यानंतर पार्टीतील अनेकांकडून केजरीवाल यांना सल्ले देण्यात आले.