शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी; कल्पना चांगली अंमलबजावणी सदोष, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. थालेर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 04:31 IST

नवी दिल्ली : एक हजार आणि पाचशे रुपये यासारख्या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून चांगला होता

नवी दिल्ली : एक हजार आणि पाचशे रुपये यासारख्या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून चांगला होता, पण त्याची अंमलबजावणी मात्र खूपच सदोष पद्धतीने केली गेली, असे मत यंदाचा नोबेल पुरस्कार मिळविणारे अर्थतज्ज्ञ प्रा. रिचर्ड थालेर यांनी व्यक्त केले आहे.शिकागो विद्यापीठातील स्वराज कुमार या विद्यार्थ्याने नोटाबंदीविषयी प्रा. थालेर यांचे मत विचारले होते. त्याला प्रा. थालेर यांनी टिष्ट्वटरवर उत्तर दिले. स्वराज कुमार याने मूळ प्रश्न आणि त्यावरील प्रा. थालेर यांचे उत्तर टिष्ट्वटरवर टाकले. प्रा. थालेर यांचे हे मतप्रदर्शन नवे नाही. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर प्रा.थालेर यांनी लगेच टिष्ट्वटरवर त्याचे स्वागत करताना लिहिले होते की, या धोरणाचा मी पाठीराखा आहे. रोखताविरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे व भ्रष्टाचार कमी करण्याच्या दिशेने ही चांगली सुरुवात आहे. मात्र नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्याचे कळल्यावर प्रा. थालेर यांनी ‘खरंच? बोंबला!’ असे दोनच शब्दाचे टिष्ट्वट केले.>काळ्या पैशावर चालणाºया समांतर अर्थव्यवस्थेवर घाला घालणे आणि अर्थव्यवस्थेतील रोखीचे व्यवहार कमी करणे, या उद्देशांनी नोटाबंदी करण्यात आली हे विचारात घेतले तर नोटाबंदी लागू असतानाच लगोलग दोन हजार रुपयांच्या नव्या चलनी नोटा काढण्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता, असेही प्रा. थालेर यांनी म्हटले.

टॅग्स :Note Banनोटाबंदी