शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरसह उत्तर भारत गोठलेलाच; अनेक भागात जाेरदार बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी, देशात इतरत्र दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:43 IST

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही जाेरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक आनंदी झाले आहेत. तर, राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे.

श्रीनगर/नवी दिल्ली : उत्तर भारतात सुरू असलेल्या थंडीचा कडाका रविवारी थाेडा कमी झाला असला तरी जम्मू-काश्मीरमध्ये मात्र अनेक भागांत तापमान शून्य अंशाच्या खाली असल्याने सामान्य जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, राजस्थानात काही भागांत हलका पाऊस होत असून अनेक भागांत दाट धुक्याचे साम्राज्य आहे.

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही जाेरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक आनंदी झाले आहेत. तर, राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे. राजस्थानातील अनेक भागांत धुक्यामुळे दृष्यमानता ५० मीटर इतकी नोंदवली गेली. या धुक्यामुळे महामार्गांवर वाहतूक संथ सुरू होती. येत्या दोन दिवसांत राज्याच्या अनेक भागांत तापमान आणखी कमी होण्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे.

श्रीनगरमध्ये विमान सेवा, महामार्ग पुन्हा सुरू - श्रीनगरमध्ये हाेत असलेल्या हिमवृष्टीमुळे दोन दिवसांपासून बंद असलेली विमानसेवा रविवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या येथील हवामान पाहता ही सेवा सुरळीतपणे सुरू राहील, अशी अपेक्षा विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.- दरम्यान, काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग एक दिवस बंद ठेवल्यानंतर रविवारी वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

‘चिल्ला-ए-कलां’च्या काळात वाढली थंडीकाश्मीर खोऱ्यात २१ डिसेंबर ते ३१ जानेवारी हा काळ ‘चिल्ला-ए-कलां’म्हणून ओळखला जातो. या काळात कडाक्याची थंडी असते. यानंतर २० दिवस ‘चिल्ला-ए-खुर्द’ आणि १० दिवस ‘चिल्ला-ए-बच्चा’ काळात कडाका कमी झाला तरी थंडीची लाट कायम राहणार आहे.

गुलमर्गमध्ये पारा शून्याच्या खाली ८ अंशावरकाश्मीरमध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे ८ अंश नोंदवले गेले, तर अमरनाथ यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या पहलगाममध्ये तर तापमान उणे ८.५ अंशावर गेले आहे. श्रीनगरमध्ये रात्रीचे तापमान उणे ०.२ अंश होते.