शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

‘अवनी’चा अहवाल न दिल्यास निधी रोखणार; राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 06:05 IST

अवनी या वाघिणीने विदर्भातील पांढरकवडा भागात मोठी दहशत निर्माण केली होती.

- भावेश ब्राह्मणकरनवी दिल्ली : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जंगलात अवनी वाघिणीच्या मृत्यूस तब्बल सव्वा वर्ष झाले तरी महाराष्ट्र सरकारने त्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाला (एनटीसीए) दिलेला नाही. प्राधिकरणाने वारंवार स्मरणपत्र दिले तरी त्यास राज्य सरकारने केराची टोपली दाखविली आहे. हा अहवाल दिला नाही तर व्याघ्र संरक्षणासाठीचा निधी बंद करण्याचा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.अवनी या वाघिणीने विदर्भातील पांढरकवडा भागात मोठी दहशत निर्माण केली होती.

मानव-वन्यप्राणी संघर्षातील हे एक मोठे उदाहरण होते. या वाघिणीमुळे परिसरात मोठे संकट निर्माण होणार असल्याने राज्याच्या वनविभागाने तिला ठार करण्याचे आदेश दिले. त्यास वन्यजीवप्रेमींनी विरोध केला. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. ती फेटाळण्यात आल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. तेथेही वन विभागाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, ज्यावेळी या वाघिणीला ठार करण्यात आले त्यावेळी अनेक नियम पायदळी तुडविण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याने हे सारेच प्रकरण देशभर गाजले.

रात्रीच्यावेळी अवनीला ठार केले, त्यावेळी तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला नाही, तिला डार्ट लावला नाही आणि त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकारीही उपस्थित नव्हता, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अखेर याची दखल घेऊन राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने अवनीबाबतचा सखोल अहवाल राज्य सरकारकडे मागितला. मात्र, त्यास दाद देण्यात आली नाही. याबाबत आम्ही अनेकवेळा स्मरणपत्रे दिली तरीही अजून राज्य सरकारने अहवाल दिला नसल्याची माहिती प्राधिकरणाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. अनुप कुमार सहाय यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.या पर्यायांचा अवलंब होणारकेंद्र सरकारकडून व्याघ्र संरक्षणासाठी ६० टक्के निधी दिला जातो. त्याचे वितरण प्राधिकरणामार्फत होते. जर, अवनीचा अहवाल मिळाला नाही तर हा निधी बंद करण्याचा थेट इशारा प्राधिकरणाने दिला आहे. याचा परिणाम केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांसह व्याघ्र संरक्षणाच्या कार्यावरही होऊ शकतो. वन्यजीव संरक्षण कायदा कलम ५५ च्या आधारे प्राधिकरण राज्य सरकारला नोटीस देऊन न्यायालयात जाऊ शकते. विशेष म्हणजे, या कलमाच्या आधारे सर्वसामान्य व्यक्तीही राज्य सरकार किंवा प्राधिकरणाला माहितीच्या अधिकारात अहवालाची विचारणा करु शकतो. तसेच, आणखी एक पर्याय प्राधिकरणाकडे आहे. तो म्हणजे, लेखापरीक्षक नेमण्याचा. त्याद्वारे राज्य सरकारला दिलेल्या निधीचे लेखापरीक्षण केले जाऊ शकते. निधी रोखण्याच्या पर्यायाबाबत प्राधिकरणारकडून सध्या गांभीर्याने विचार सुरू आहे.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीण