शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

SEBIनं सुब्रतो रॉय यांच्या विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट केलं रद्द

By admin | Updated: April 21, 2017 17:46 IST

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी कोर्टानं दिलासा दिला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी कोर्टानं दिलासा दिला आहे. सुब्रतो रॉय हे नियमित सुनावणीला उपस्थित राहत असल्यानं सेबी कोर्टानं सुब्रतो रॉय यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केलं आहे. रॉय यांच्यावरील आरोप निश्चित प्रकरणावरही 18 मे रोजी सुनावणी होणार आहे, असं कोर्टानं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं 300 कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरल्याने सहाराच्या पुणे येथील अ‍ॅम्बी व्हॅलीतील मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. सहारा समूह गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता. त्यावेळी 17 एप्रिल 2017पर्यंत सहारा समूहानं रक्कम न भरल्यास पुण्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीच्या 40,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात यावा, असा सल्लावजा आदेशच सर्वोच्च न्यायालयानं सहारा समूहाला दिला होता.मालमत्तेच्या लिलावातून गुंतवणूकदारांच्या ठेवी त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी रक्कम जमवण्यास मदत होईल, यासाठी सहारा समूहाला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीचे मूल्य 40 हजार कोटी रुपये आहे. 17 एप्रिलपर्यंत ही रक्कम भरण्यात येईल, असं सहारा समूहानं न्यायालयाला आश्वासन दिलं होतं. यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयानं सांगितले होते की, जर या प्रकरणात काही रक्कम जमा करण्यात येत असेल तर न्यायालय वेळ वाढवून देण्याबाबत विचार करेल. दरम्यान, सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी सहाराची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या आईच्या निधनानंतर 6 मे 2016 रोजी न्यायालयाने रॉय यांना चार आठवड्यांसाठी पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर पॅरोलची मुदत वाढवूनही देण्यात आली होती. तसेच 4 मार्च 2014 रोजी रॉय यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते.