शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

2019मध्ये नरेंद्र मोदींचा कोणीच करू शकणार नाही मुकाबला- नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 18:44 IST

बिहारमध्ये भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता नितीश कुमार हे भाजपाच्या बाजूनं बोलू लागले आहेत.

ठळक मुद्दे2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही, असं नितीश कुमार म्हणाले आहेतनरेंद्र मोदींशी सामना करण्याची क्षमता कोणातच नाही, 2019मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी कोणाशीही तडजोड करू शकत नाही. तेजस्वी यादवला फक्त सीबीआय छाप्यांवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं होतं.

पाटणा, दि. 31 - बिहारमध्ये भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता नितीश कुमार हे भाजपाच्या बाजूनं बोलू लागले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही, असं नितीश कुमार म्हणाले आहेत. बिहारमध्ये एनडीएसोबत संसार थाटल्यानंतर नितीश कुमारांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींशिवाय देशाला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदींशी सामना करण्याची क्षमता कोणातच नाही, 2019मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील. 2019मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नितीश कुमारांनी हे उत्तर दिलं आहे.ते म्हणाले, 2019मध्ये दिल्लीची सत्ता कोणी दुसरं काबिज करू शकत नाही. यावेळी नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी कोणाशीही तडजोड करू शकत नाही. तेजस्वी यादवला फक्त सीबीआय छाप्यांवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं होतं. मात्र ते त्यासाठी तयार नव्हते. कारण त्यांच्याजवळ बोलण्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे मला महागठबंधन ठेवणं कठीण झालं होतं. नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका केली आहे. काही जण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पैसा कमावता आहेत. हे मी कसं सहन करू शकतो. माझ्याजवळ दोनच मार्ग होते, एक तर भ्रष्टाचाराशी तडजोड करावी अन्यथा लोकांच्या टीकेचं धनी व्हावं. मी कोणत्याही टीकेला घाबरत नाही. त्यांच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे चादर ओढून पैसा कमावणं आहे. नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकला समर्थन दिल्यानंतरही माझ्यावर अनेकांनी टीका केली. मात्र मी सुरुवातीपासूनच यासोबत होतो.80 टक्के लोकांकडे 1000 ते 500च्या जुन्या नोटा होत्या. बेनामी संपत्तीवर कडक कारवाई करण्याच्या बाजूनं मी होतो. जर आता कोणाच्या बेनामी संपत्तीवर छापा पडत असल्यास मी त्याचं समर्थन करू शकत नाही. आरजेडीसोबत सरकारमध्ये असताना मी खूप आरोप सहन केले. मात्र आघाडीमध्ये अशा गोष्टी होत असतात, असं धरून मी चाललो. माझ्या पक्षाकडून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर कोणीही टीका केली नव्हती. मात्र राष्ट्रीय जनता दलानं ब-याचदा आमच्यावर वादग्रस्त टीका केली. राष्ट्रीय जनता दलानं सरकारच्या कामातही हस्तक्षेप केला होता. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात अभियान चालवलं होतं. तरीही तेजस्वी यादवला आम्ही एक संधी दिली होती. मात्र त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचं स्पष्टीकरण दिलं नाही. ते स्पष्टीकरण त्यांना जनतेसमोर द्यायचं होतं. तेजस्वी यांनी तसं केलं असतं तर महागठबंधन कायम राहिलं असतं.