शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना नोबेल पुरस्कार द्या, BSE च्या सीईओंनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 08:26 IST

BSE चे सीईओ आशिष चौहान यांनी गेल्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि सरकारच्या प्रयत्नांनी तुलना केली.

नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावाचा विचार व्हायला हवा, असे मुंबई शेअर बाजाराचे (BSE) सीईओ आशिष चौहान यांनी सांगितलं. यासाठी चौहान यांनी कोरोना महासाथीच्या काळात सरकारनं केलेल्या कामांची माहितीही दिली. त्याचबरोबर एक भारतीय नागरिक म्हणून देशातील गरिबांना मिळालेल्या मानवतावादी मदतीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असंही ते म्हणाले.

"कोरोना महासाथीच्या काळात ८० कोटी लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्याच्या मर्यादेत आम्हाला सर्व सुविधा दिल्याबद्दल सरकारचे आभारी आहोत. आपण किंवा जगानं याचा स्वीकार केला नसला, तरी हे एक अतुलनीय काम आहे," असं चौहान म्हणाले. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या फुड प्रोग्राम आणि सरकारच्या प्रयत्नांची तुलना केली. शुक्रवारी एका दीक्षांत समारंभात बोलताना ते म्हणाले की, "सुमारे ८० कोटी लोकांना लाभ देणारी मोफत रेशन योजना ही गेल्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळविलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक फूड प्रोग्रामनं केलेल्या कामापेक्षा खुप मोटी आहे."

“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोफत रेशन योजनेने भारतातील गरीब नागरिकांना अराजकता आणि दुःखापासून वाचवलं आहे. ते आपण चीनसह अन्य देशांमध्ये आपण पाहिलं आहे. संपूर्ण युरोप किंवा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा किंवा संपूर्ण दक्षिण अमेरिकन देशांपेक्षा दोन वर्षांहून अधिक काळ मोफत अन्नधान्य देण्यात आलेल्या लोकांची संख्या जास्त होती," असंही त्यांनी सांगितलं.

UN नं ११.५५ कोटी लोकांना धान्य दिलं"जर आपण तुलना केली तर २०२० मध्ये नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या युएनच्या कार्यक्रमाकडे पाहिलं तर भारताच्या ८० कोटींच्या तुललनेत ११.५५ कोटी लोकांना आंशिक मदत पुरवली. ही भारतानं केलेल्या मदतीच्या केवळ १४ टक्के आहे. याचाच अर्थ नोबेल पीस प्राईज कमिटी नोबेल पीस प्राईज देण्यासाठी पंतप्रधआन नरेंद्र मोदी आणि भारत सरकारची कामगिरी पाहिल का? हे पाहावं लागणार आहे," असंही चौहान म्हणाले. यावेळी त्यांनी लसीकरण मोहिमेचंही कौतुक केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNobel Prizeनोबेल पुरस्कारcorona virusकोरोना वायरस बातम्या