शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

एजेएसयूमुळेच झाले नाही जागा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:45 IST

भाजप म्हणतो आमच्या यशाला ते धक्का लावू शकत नाहीत

जमशेदपूर (झारखंड) : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप होऊ न शकल्याचा ठपका भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष आॅल झारखंड स्टुडंटस् युनियनवर (एजेएसयू) सोमवारी ठेवला. राज्यात विधानसभा निवडणुकीत एजेएसयू दोन ते तीन जागांचा अपवाद वगळता भाजपच्या यशाला काही धक्का लावू शकत नाही, असा दावा झारखंड भाजपचे अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांनी केला.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एजेएसयूला आठ जागा दिल्या होत्या व यावेळी १३ ते १४ जागा देण्याची भाजपची तयारी होती. परंतु एजेएसयूचे अध्यक्ष सुदेश महातो हे १८ ते २२ जागाच मिळाल्या पाहिजेत, असे अडून बसले होते, असे गिलुआ म्हणाले. महातो यांनी मात्र आमच्या पक्षाने भाजपकडे १७ उमेदवारांची यादी विचारार्थ पाठविली होती, असे म्हटले.भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून, त्याला तसाच मान मिळाला पाहिजे व त्यांनी (एजेएसयू) त्या प्रमाणात जागा वाटप मान्य केले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी एजेएसयू हा प्रादेशिक पक्ष असल्याचा उल्लेख केला. राज्यात ८१ सदस्यांच्या विधानसभेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपने ७३ उमेदवारांची तर एजेएसयूने २७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे १९ मतदारसंघांत रालोआतील भाजप व एजेएसयू हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतील. असे असले तरी भाजप किंवा एजेएसयूपैकी एकानेही आम्ही अधिकृतरीत्या वेगळे झालेलो आहोत, असे जाहीर केलेले नाही. याचा अर्थ निवडणुकीनंतर आघाडी करण्यास त्यांनी जागा ठेवली आहे.१५ नोव्हेंबर, २००० रोजी बिहारमधून झारखंड राज्य वेगळे केले गेले तेव्हापासून भाजप आणि एजेएसयू मित्र आहेत. तेव्हा महातो हे गृह मंत्रालयासह उपमुख्यमंत्रीपदावर होते. महातो यांचा २०१४ मध्ये सिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आणि त्याच मतदारसंघात झालेली पोटनिवडणूकही ते जिंकू शकले नाहीत.भाजपने तिकीट नाकारले, सरयू रॉय यांचा दावाजमशेदपूर : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरुद्ध जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राज्याचे माजी मंत्री सरयू रॉय यांनी भाजपने त्यांना तिकीट नाकारण्यांच्या कारणांपैकी एक माझी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी असलेली जवळीक असावी, असे दिले आहे.उमेदवारांची यादी अंतिम केलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या किमान तीन सदस्यांनी मला सांगितले की, नितीशकुमार यांच्या हस्ते २०१७ मध्ये माझ्या पुस्तकाच्या झालेल्या प्रकाशनामुळे मला पक्षाने तिकीट नाकारले असण्याची दाट शक्यता आहे, असे रॉय यांनी सांगितले.रॉय म्हणाले, नितीश कुमार हे जुलै २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परत आले व त्यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन केले. त्यामुळे मला तिकीट का नाकारले हे समजत नाही. रॉय यांनी जो काही दावा केला त्याबद्दल भाजपकडून काहीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.