शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आता घरी लागणार नाहीत 'स्मार्ट मीटर', लहान व्यावसायिकांनाही वगळले, सरकारकडून जनआक्रोशाची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 07:15 IST

Smart Meters: मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील, असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले.

मुंबई - मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील, असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले.

मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील, असे स्पष्ट झाले.

- २.१६ कोटी सर्वसामान्य ग्राहकांकडे बसविणार होते स्मार्ट वीज मीटर- ४ कंपन्यांना दिले होते कंत्राट- स्मार्ट मीटरचे कंत्राट अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकार्लो या कंपन्यांना देण्यात आले होते.- येत्या आठवड्यापासून ते बसविण्यास सुरुवात होणार होती.- आता मात्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे.

मीटरवरून दावे-प्रतिदावेलोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मार्ट मीटरविरोधात नाराजीचे सूर उमटले होते. वीजग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्येही त्याबाबत रोष होता. या मीटरमुळे विजेचे बिल अधिक येईल, असा काहींचा दावा होता.

- २५.६ लाख औद्योगिक व मोठ्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविणार.- स्मार्ट मीटर हे प्रीपेड स्वरुपाचे आहे. त्यामुळे वीज चोरी, चुकीचे मीटर रिडिंग करून अवाजवी बिले दिली जाणे याला आळा बसेल, असे महावितरणचे म्हणणे होते.- सध्याच्या पद्धतीत वीज कर्मचारी रिडिंग घ्यायचे, वीज बिलांचे वाटप करायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर स्मार्टमीटरमुळे गदा येईल, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmahavitaranमहावितरणelectricityवीज