शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine Booster Dose : कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज आहे का? ICMR प्रमुखांनी काय सांगितले? जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:46 IST

Corona Vaccine Booster Dose: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाच्या (NTAGI) पुढील बैठकीत बूस्टर डोसवर चर्चा होऊ शकते.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या  (Coronavirus) संसर्गापासून लोकांना वाचवण्यासाठी सध्या कोरोना लसीच्या बूस्टर डोसच्या (Corona Vaccine Booster Dose) गरजेबाबत बरीच चर्चा होत आहे. दरम्यान, कोरोना लसीचा (Corona Vaccine) बूस्टर डोस किंवा तिसरा डोस देण्याच्या गरजेच्या समर्थनात आतापर्यंत कोणतेही वैज्ञानिक पुरावे आलेले नाहीत, असे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सोमवारी सांगितले. तसेच, सध्या वयस्क लोकांना लसीचा दुसरा डोस देणे हे सरकारचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाच्या (NTAGI) पुढील बैठकीत बूस्टर डोसवर चर्चा होऊ शकते. आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव यांनी एका या वृत्तसंस्थेला सांगितले की, संपूर्ण वयस्क लोकांना लसीचा दुसरा डोस देणे आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लसीकरण सुनिश्चित करणे हे सरकारचे सध्याचे प्राधान्य आहे. कोरोना विरोधात बूस्टर डोसची गरज असल्याचे समर्थन करण्यासाठी अद्याप कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

लसीचा बूस्टर डोस देण्याच्या शक्यतेवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच सांगितले होते की, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य आहे. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार बुस्टर डोसबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले होते. तसेच, सरकार अशा प्रकरणात थेट निर्णय घेऊ शकत नाही. ज्यावेळी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि तज्ज्ञांची टीम बूस्टर डोस देण्याबाबत सांगेल, त्यावेळी आम्ही त्यावर विचार करू, असेही मनसुख मांडविया यांनी म्हटले होते.

याचबरोबर, मनसुख मांडविया असेही म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच तज्ज्ञांच्या मतावर अवलंबून असतात, मग ते लस संशोधन असो, निर्मिती असो किंवा मान्यता असो. अधिकार्‍यांच्या मते, भारतातील पात्र लोकांपैकी जवळपास 82 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर सुमारे 43 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या