शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लस घेण्याची घाई नाही; ६९ टक्के भारतीयांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 02:00 IST

कोरोनाची लस घेण्यास संकोच

मुंबई : कोरोना लस दृष्टिपथात येत असताना ती घेण्याबाबत लोकांच्या मनातील संकोच वाढताना दिसत आहे. लोकल सर्कलने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ६१ टक्के लोकांनी लस घेण्याची घाई करणार नाही, असे मत व्यक्त केले होते. त्याच मुद्द्यावर नव्याने केलेल्या सर्वेक्षणात ६९ टक्के लोकांनी साशंकता व्यक्त केली आहे. लोकल सर्कलच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपासून सर्वेक्षण केले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात ६१, नोव्हेंबर महिन्यात ५९ टक्के लोकांनी लस घेण्यास साशंकता व्यक्त केली होती. त्यात आता वाढ झाल्याचे अधोरेखित होत आहे. ही लस घेण्यासाठी तीन ते सहा महिने थांबण्याची तयारी असल्याचे २७ टक्के लोकांनी सांगितले आहे. ६ ते १२ महिने थांबण्याची १५ टक्के लोकांची तयारी आहे. सहा टक्के लोकांना लस घेण्याची गरजच वाटत नाही, तर १३ टक्के लोकांना याबाबतचा निर्णय घेता येत नाही.कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे मत ३३ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. हर्ड इम्युनिटी निर्माण झाल्याचे १४ टक्के लोकांचे म्हणणे असून मुळातच भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने कोरोनाचा फैलाव एका मर्यादेपेक्षा जास्त झाला नसल्याचे ८ टक्के लोकांना वाटते. कोरोना विषाणूची शक्ती घटल्याचे १५ टक्के लोकांचे म्हणणे असून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिणामकारक ठरत असल्याची ८ टक्के लोकांची भावना आहे. त्यामुळे लसीची प्रतीक्षा आहे. यश अंतिम टप्प्यातजगभरात लसनिर्मितीच्या युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत असून ही लस आता दृष्टिपथात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या