शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संबंधांना नेहमीच बलात्कार म्हणता येणार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:39 IST

काही प्रकरणांमध्ये असते परस्पर संमती, आरोपीची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : एखाद्या महिलेने पुरुषाशी जिव्हाळ्याने दीर्घकाळ सलगी राखली असेल आणि  लग्नाच्या आश्वासनानंतर त्यांच्यात निर्माण झालेल्या लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार एका महिलेने केली होती. या खटल्यातील आरोपीची दिल्ली उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.हा निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, पुरुषाने महिलेला लग्नाचे आश्वासन दिल्यामुळे त्यांच्यात प्रदीर्घ काळ लैंगिक संबंध कायम राहिले असतील असे सरसकट म्हणता येत नाही. न्या. विभू बाखरू यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, जोडीदाराला लग्नाचे वचन दिल्यानंतर काही प्रकरणांमध्ये स्त्री-पुरुष परस्पर संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित करीत असतात. कधी कधी तसे संबंध राखण्याची त्या जोडप्यापैकी एखाद्या व्यक्तीला मनातून इच्छा नसतानाही त्याला राजी व्हावे लागत असू शकते. खोटे आश्वासन पडेल महागातदिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याच्या प्रकरणात पीडिता आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार करू शकते. अशा प्रकरणांत दोषीला शिक्षा होऊ शकते. मात्र जोडप्यामध्ये दीर्घकाळ सलगीचे संबंध असतील तर अशा प्रकरणात बलात्काराचा आरोप करता येणार नाही.

टॅग्स :Rapeबलात्कार