शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

मोदींनी पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा घालवली- मनमोहन सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 14:04 IST

सरकारच्या या धोरणांमुळे लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे.

बंगळुरू: आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाने आपल्या कार्यालयाचा वापर विरोधकांवर टीका करण्यासाठी केला नव्हता. याउलट नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिवसरात्र याच कामासाठी जुंपले आहे. पंतप्रधानांनी इतक्या खालच्या पातळीला जाणे, योग्य नाही. ते देशासाठीही योग्य नव्हे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही सडकून टीका केली. सरकारच्या या धोरणांमुळे लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. काही दिवसांपूर्वी रोख चलनाच्या पुरवठ्याअभावी एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळाला होता. ही परिस्थिती टाळता आली असती. नोटबंदीचा निर्णय व जीएसटीची घाईघाईत केलेली अंमलबजावणी या मोदी सरकारच्या काळातील दोन घोडचुका आहेत. त्यामुळे देशातील लघू व मध्यम उद्योगांना फटका बसून अनेकांना रोजगार गमवावे लागले, अशी टीकाही यावेळी मनमोहन सिंग यांनी केली. 

 

 

मनमोहन सिंग यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे:1. मोदी सरकारने लोकशाही पद्धतीने होणारी चर्चा थांबवली.2. समस्यांवर चर्चा करण्याऐवजी मोदी सरकारने धमकावयाला सुरूवात केली. 3. भारताची रचना ही जटील आणि व्यापक आहे. त्यामुळे एकटा माणूस हे सर्व हाताळू शकत नाही. 4. जेव्हा जेव्हा सरकारच्या चुकांकडे लक्ष वेधले जाते तेव्हा सरकार इतरांच्या चुका शोधून त्यांना अडचणीत आणायला बघते.5. मोदी सरकार फक्त बड्या घोषणा करते. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य असते.  

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी