शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो नको, याचिकाकर्त्यास 1 लाख रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 12:48 IST

देशातील लसीकरणाचे कौतुक होत असताना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावरुन टीका होत आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची गरज काय, असे म्हणत विरोधकांसह अनेकांनी या फोटोला आक्षेप घेतला होता.

ठळक मुद्देयाचिकाकर्ते पीटर म्यालिपरम्पिर यांनी पंतप्रधानांच्या छायाचित्राशिवाय लस प्रमाणपत्र देण्याची मागणी केंद्राकडे केली होती, पण त्यांना सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता

कोची - देशात कोरोना महामारीने थैमान घातले होते, कधी नव्हेत ते पहिल्यांदाच देशाने लॉकडाऊनला तोंड दिले. कोरोनापासून बचावासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर देशात कोविड 19 वरील लस आली अन् मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्यासाठी देशपातळीवर यंत्रणा कामाला लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने मोफत लसीकरण केले. गतीमान लसीकरणामुळे देशात 100 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 

देशातील लसीकरणाचे कौतुक होत असताना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावरुन टीका होत आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची गरज काय, असे म्हणत विरोधकांसह अनेकांनी या फोटोला आक्षेप घेतला होता. त्यातच, एका नागरिकाने यासंदर्भात केरळ उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवर आज अंतिम सुनावली झाली. त्यानुसार, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून याचिकाकर्त्यास 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.  'देशातील नागरिकाकडून अशा प्रकारच्या याचिका अपेक्षित नाहीत. यामध्ये याचिकाकर्त्याचा खोडसाळपणा दिसून येतो. पंतप्रधानांचा फोटो आणि त्यांचा सामाजिक संदेश यावर आक्षेप घेणं हे एका भारतीय नागरिकाकडून अपेक्षित नाही', असं न्यायालयानं म्हटलं. “आज न्यायालयांमध्ये हजारो प्रकरणं प्रलंबित असताना अशा प्रकारच्या याचिका करणं म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया घालवणं आहे”, असंही कोर्टाने सुनावलं.  देशात अगोदर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या संदर्भातील खटले दाखल आहेत. या खटल्यातील आरोपी तुरुंगात असून त्यांचे अपील कोर्टात दाखल असतात. या सुनावणींना विलंब होत आहे, त्यात अशा याचिका म्हणजे राजकीय हेतुने प्रेरीत आहेत, असे मत न्यायालयाने नमूद केले आहे. तसेच, याचिकाकर्त्याने न्यायालयाचा वेळ घालवल्याचे कारण देत 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याचिकाकर्त्याने दिलेल्या वेळेत दंड न भरल्यास मालमत्ता जप्त करुन हा दंड वसुल करण्याचेही आदेश न्यायलयाने दिले आहेत. 

दरम्यान, याचिकाकर्ते पीटर म्यालिपरम्पिर यांनी पंतप्रधानांच्या छायाचित्राशिवाय लस प्रमाणपत्र देण्याची मागणी केंद्राकडे केली होती, पण त्यांना सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. लशीच्या दोन्ही मात्रांसाठी आपण पैसा मोजला आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्र ही आपली खासगी बाब आहे. त्यावर आपली वैयक्तिक माहिती आहे. त्यामुळे या खासगी बाबीत कोणतेही अतिक्रमण होणे योग्य नाही, असे पीटर यांचे म्हणणे होते. यावर त्यांनी याचिका दाखल केली होती. 

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयCorona vaccineकोरोनाची लस