शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला बाहेरच्यांनी सल्ला देऊ नये, सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 22:54 IST

बाहेरच्यांनी आम्हाला काय करावे आणि काय करु नये, याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे. 

ठळक मुद्देदेश चालवण्यास आम्ही सक्षम आहोतआम्हाला बाहेरच्यांनी सल्ला देऊ नयेसचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार  शाहिद आफ्रिदीने सहानुभूती व्यक्त केली आहे. त्याने लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकत ट्विट केले. यामध्ये त्याने काश्मीरमधील स्थिती गंभीर असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रसह आतंरराष्ट्रीय संघटनांच्याबाततीत सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे.  शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटवर भारताचा कर्णधार विराट कोहली, गौतम गंभीर, सुरेश रैना आणि कपिल देव यांनी त्याला चांगलेच धारेवर धरल्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा त्याला फटकारले आहे. आमचा देश चालविण्यासाठी आमच्याकडे सक्षम लोक आहेत. बाहेरच्यांनी आम्हाला काय करावे आणि काय करु नये, याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे. 

दरम्यान, बंगळुरु येथे सध्या विराट कोहली आयपीएलचा सराव करत आहे. यावेळी त्याला काही पत्रकारांनी शाहिद आफ्रिदीने केलेल्या ट्विटबद्दल विचारले. त्यावर देशाविरोधात गरळ ओकणाऱ्याला कधीच माफ करणार नाही, असे कोहलीने म्हटले आहे. तो म्हणाला, एक भारतीय म्हणून तुम्ही नेहमीच देशाच्या हिताचा विचार करता. पण जर कोणी माझ्या देशाविरोधात कुणी काही बोलणार असेल तर ते कधीच खपवून घेतले जाणार नाही. 

याचबरोबर, शाहिद आफ्रिदीच्या ट्विटवर कपिल देव म्हणाले यांनी सुद्धा जास्त महत्व दिले नाही. हा शाहिद आफ्रिदी कोण आहे? त्याला आपण एवढे महत्व का देत आहोत. या प्रकारच्या लोकांना आपण जास्त महत्व देता कामा नये, असे म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरShahid Afridiशाहिद अफ्रिदी