शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांच्या छळाचा अधिकार कुणालाही नाही; तक्रारखोर नागरिकांना कोर्टाने खडसावले; परिपत्रक रद्द करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:55 IST

एकदा त्यांच्या तक्रारीला उत्तर दिल्यानंतर त्याच विषयावर वारंवार केलेल्या तक्रारींना उत्तर देऊ नये, असे पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.

मुंबई : एकाच मुद्याविषयी वारंवार तक्रारी करून सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देणे हा मूलभूत अधिकार नाही, असे खडसावत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे एक परिपत्रक रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला.

कर्तव्यचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न नाही. मात्र, वारंवार तक्रार करणाऱ्यांच्या धमक्यांमुळे आणि दबावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे, हे अपेक्षित नाही, असे न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने सुनावले. अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला गैर हेतूने लक्ष्य करून सरकारी कामात अडथळा आणण्याची कृती निषेधार्ह ठरते, असे न्यायालयाने म्हटले. खराब रस्ते आणि झाडे तोडण्यासंदर्भात चार नागरिकांनी  वारंवार अनेक तक्रारी केल्याने पालिकेने डिसेंबर २०२१ मध्ये परिपत्रक काढून संबंधित चार व्यक्तींच्या तक्रारी अस्वीकारार्ह असल्याचे जाहीर केले. त्यांच्या तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांची छळवणूक करण्यासाठी असतात. त्यामुळे त्यांची दखल घेऊ नये. एकदा त्यांच्या तक्रारीला उत्तर दिल्यानंतर त्याच विषयावर वारंवार केलेल्या तक्रारींना उत्तर देऊ नये, असे पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.

कोर्ट काय म्हणाले?

न्यायालयाने नमूद केले. “कर्तव्य बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच विषयावर तक्रारी करण्याचा, त्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानातून वैयक्तिक तक्रार करण्याचा मूलभूत अधिकार कोणालाही नाही. आमच्या मते, अशा धमक्या कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणू शकतात, असे न्यायालयाने म्हटले.

कोर्ट काय म्हणाले?

न्यायालयाने नमूद केले. “कर्तव्य बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच विषयावर तक्रारी करण्याचा, त्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानातून वैयक्तिक तक्रार करण्याचा मूलभूत अधिकार कोणालाही नाही. आमच्या मते, अशा धमक्या कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणू शकतात, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालय