शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इतर धर्माच्या अवमाननेचा कोणालाही अधिकार नाही, कर्नाटक उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:24 IST

Karnataka High Court : एका महिलेने ख्रिश्चन व्यक्तीबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवली. यात ख्रिश्चन व्यक्ती त्यांच्या घरी आली व त्यांना भगवतगीता किंवा कुराण या कशामुळेही मन:शांती मिळणार नाही, कारण येशूख्रिस्ताशिवाय कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही, असे सांगितले.

- डॉ. खुशालचंद बाहेती 

बंगळुरू : कोणत्याही धर्माचे आचरण किंवा प्रसार करताना इतर धर्माचा अवमान करण्याचा किंवा त्यास कमी लेखण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे कर्नाटक उच्च न्यायलयाने म्हटले आहे.एका महिलेने ख्रिश्चन व्यक्तीबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवली. यात ख्रिश्चन व्यक्ती त्यांच्या घरी आली व त्यांना भगवतगीता किंवा कुराण या कशामुळेही मन:शांती मिळणार नाही, कारण येशूख्रिस्ताशिवाय कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही, असे सांगितले.पोलिसांनी यात २९५अ  (धार्मिक भावना दुखावणे) आयपीसीचा गुन्हा नोंदवला. तपासानंतर पोलिसांनी २९८ आयपीसी (एखाद्या धर्माबद्दल अपशब्द उच्चारणे) या कलमाप्रमाणे दोषारोप न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने खटला चालवण्यास संमती दिल्यानंतर ख्रिश्चन व्यक्तीने उच्च न्यायालयात खटला रद्द होण्यासाठी अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयात या खटल्यामुळे त्यांना भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारांचा भंग होतो, असा मुद्दा होता. घटनेने दिलेल्या परिच्छेद १४ (समानतेचा अधिकार), २१ (मुक्त जगणे), २५ (धार्मिक स्वातंत्र्य) याचा भंग या खटल्यामुळे होतो, असा युक्तिवाद करण्यात आला. तसेच हे कृत्य २९८ आयपीसीचा गुन्हा ठरत नाही असाही मुद्दा होता.मात्र, उच्च न्यायालयाने स्वत:च्या धर्माचे पालन करताना धर्म प्रमुख किंवा इतर कोणालाही अन्य धर्माचा अवमान करण्याचा , किंवा कमी लेखण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, असे मत व्यक्त करत याचिका फेटाळली.

न्यायालयाने काय म्हटले?-    तक्रार व साक्षीदारांचे जवाबात कोणताही धर्म मनशांती देत नाही. फक्त येशू ख्रिस्तच सर्व आपत्तीपासून रक्षण करू शकतात असे नमूद आहे. यावरून २९८ आयपीसीचा गुन्हा होत नाही. हे मान्य करता येणार नाही.-    या खटल्यामुळे घटनेच्या परिच्छेद १४, २१, २५ चा भंग होत नाही.-    कोणत्याही धर्माला कमी लेखण्याचा , त्याचा अवमान करण्याचा कसलाही घटनात्मक अधिकार अन्य धर्मीयांना प्राप्त होत नाही.(न्या. एच.पी. संदेश)कर्नाटक उच्च न्यायालय.

टॅग्स :Courtन्यायालय