शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर गस्त घालण्यापासून भारतीय जवानांना कोणीही रोखू शकत नाही- राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 05:56 IST

लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातील सीमारेषेची स्थिती चिनी सैनिकांनी २९ आॅगस्टच्या मध्यरात्री बदलण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : जगातील कोणतीही शक्ती भारतीय सैनिकांना लडाखमध्ये देशाच्या सीमेवर गस्त घालण्यापासून रोखू शकत नाही, असा कडक इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी चीनला दिला.पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. त्यासंदर्भात राज्यसभेत केलेल्या निवेदनात राजनाथसिंह यांनी सांगितले की, सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज झालाआहे.लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातील सीमारेषेची स्थिती चिनी सैनिकांनी २९ आॅगस्टच्या मध्यरात्री बदलण्याचा प्रयत्न केला. भारत व चीन हे तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करीत होते, नेमके त्याचवेळी चीनच्या लष्कराकडून भारताविरोधात कुरापती सुरू होत्या. त्यामुळे चीनची उक्ती व कृती यात असलेले अंतर सर्वांनाच दिसूनआले.पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिक व भारताच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव खूप वाढला आहे. त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह म्हणाले की, भारताच्या शूर जवानांनी आपले प्राण पणाला लावून मातृभूमीचे रक्षण केले आहे. चीनच्या कुरापती सुरू असूनही भारतीय लष्कराने संयम बाळगला होता व योग्य वेळ येताच चीनचा शौर्याने मुकाबला केला.सभागृहात जाहीर चर्चा न करण्यावर एकमतगलवानमध्ये काही ठिकाणी भारतीय जवानांना गस्त घालण्यास चीनने विरोध केला. त्याबद्दल काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅन्टोनी यांनी विचारलेल्या प्रश्नाला राजनाथसिंह यांनी सविस्तर उत्तर दिले. चीनबरोबरचा तणाव हा संवेदनशील विषय असून, त्यावर संसदेत चर्चा न करण्याबाबत सरकार व विरोधी पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र, या तणावाबाबत राजनाथसिंह यांनी १५ सप्टेंबर रोजी लोकसभेत केलेल्या निवेदनाबाबत काही प्रश्न विचारण्यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना अनुमती दिली होती.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह