शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अण्वस्त्र युद्ध नाहीच

By admin | Updated: September 30, 2016 01:41 IST

भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील काही राजकीय नेते पाकिस्तान सरकारवर दबाव आणत आहेत. प्रतिकारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्यांत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मुहम्मद असिफ यांचाही समावेश आहे. भारताचा विनाश करण्याची हीच वेळ असल्याची भाषाही त्यांनी केली आहे. आमची अण्वस्त्रे देखाव्यासाठी नाहीत, असे व्यक्तव्यही त्यांनी मागच्याच आठवड्यात एका टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले होते. तथापि, दोन्ही देशांत अण्वस्त्र युद्ध भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळून लावली आहे.यामागचे मुख्य कारण म्हणजे बिगर अण्वस्त्र पर्यायासंदर्भातील दोन्ही देशांमधील वाद अद्याप संपलेला नाही. आत्मघाती दहशतवादी पथके पाठवून पाकिस्तान भारताशी छुपे युद्ध करीत आहे. तथापि, या दहशतवादी संघटनांशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे पाकिस्तान वारंवार सांगत आला आहे. भारताकडून चाललेली १६० मिनिटांची ही मोहीम अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करण्याइतकीच मर्यादित होती. दरम्यान, भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा पार करून आपल्या क्षेत्रातील काही लोकांना मारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पण, अणुहल्ला करण्यासाठी पाकिस्तानला डिवचण्यासारखी ही कृती नाही. पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचे टॅक्टीकल आणि स्ट्रॅटेजिक असे दोन प्रकार आहेत. टॅक्टिकलचे क्षेत्र हे १० किमीपर्यंतचेच आहे आणि यात २०० व्यक्ती मारण्याची क्षमता आहे. ०.३ किलो टन त्याचे वजन आहे. तर, स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअरचा हल्ला संपूर्ण शहराला लक्ष्य करू शकतो. १० किलो टन एवढे त्याचे वजन आहे. जगात कोणत्याच देशाने अण्वस्त्रांचा युद्धातील डावपेचाचा भाग म्हणून वापर केलेला नाही हे येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे.