शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे Bombay नाही Mumbai High court

By admin | Updated: July 5, 2016 16:35 IST

मुंबई बरोबरच कलकता हायकोर्टाचे कोलकाता उच्च न्यायालय आणि मद्रास हायकोर्टाचे चेन्नई उच्च न्यायालय असे नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. मुंबई बरोबरच कलकता हायकोर्टाचे कोलकाता हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाचे चेन्नई हायकोर्ट असे नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे यापुढे बॉम्बे हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्ट म्हणून ओळखले जाईल. 
 
१९९५ साली बॉम्बे शहराचे मुंबई असे नामकरण झाले. पण त्यानंतरही बॉम्बे हायकोर्टाच्या नावात बदल झाला नाही. बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करावे अशी शिवसेनेची मागणी होती. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे युती सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे नामकरण झाले. 
 
दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या मुद्यावर केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांचीही भेट घेतली होती. बॉम्बे आता मुंबई म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सरकारी संस्थांना जुनी नावे नको असे सावंत म्हणाले होते. आयआयटी-बॉम्बेच्या नावातही मुंबईचा समावेश करावा अशी शिवसेनेची मागणी आहे.