शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पमुदतीच्या कर्जावर व्याज सबसिडी नको

By admin | Updated: April 25, 2016 04:19 IST

तीन लाख रुपयांपेक्षा अधिक अल्पकालिक कर्जावर व्याजावर सबसिडी देऊ नये, अशी सूचना कृषी क्षेत्रासाठी नऊ लाख कोटी रुपयांची कर्ज योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी गठित केलेल्या सरकारी समितीने केली आहे.

नवी दिल्ली : तीन लाख रुपयांपेक्षा अधिक अल्पकालिक कर्जावर व्याजावर सबसिडी देऊ नये, अशी सूचना कृषी क्षेत्रासाठी नऊ लाख कोटी रुपयांची कर्ज योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी गठित केलेल्या सरकारी समितीने केली आहे.या कर्ज योजनेची चांगल्या रीतीने अंमलबजावणी करता यावी, यासाठी त्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी सरकारने ही समिती गठित केली आहे. विशेष म्हणजे सबसिडी केवळ एक वर्षासाठी न देता कर्ज परतफेडीच्या पूर्ण कालावधीसाठी द्यावी, अशी शिफारसही समितीने केली आहे.पीक कर्ज गरज असणारे छोटे आणि मध्यम शेतकरी यांना उपलब्ध व्हावे आणि व्याज सवलत योजनेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी कृषी मंत्रालयाने व्ही.सी. सारंगी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती गठित केली आहे. व्याज सवलत योजनेनुसार शेतकऱ्यांना सध्या एक वर्षासाठी तीन लाख रुपयांच्या अल्पकालिक कर्जावर एक वर्षासाठी सात टक्के व्याज मिळते. जे शेतकरी या अवधीत कर्जाची परतफेड करतात त्यांना कर्ज चार टक्के दराने मिळते. सरकारने यंदा अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे ‘लक्ष्य’ वाढवून ९ लाख कोटी रुपये केले आहे आणि चालू वित्तीय वर्षात सबसिडीसाठी १५ हजार कोटी रुपये वितरित केले आहेत. या समितीच्या अहवालात म्हटले आहे की, २००६-०७ मध्ये व्याज सबसिडी योजना सादर केल्यानंतर कृषी कर्ज प्रवाह वाढला आहे. या कार्यक्रमाचे ‘लक्ष्य’ गाठण्यासाठी समितीने अनेक सूचना केल्या आहेत. या अहवालाच्या आधारे कृषी मंत्रालय कॅबिनेट नोट तयार करीत आहे. सारंगी समितीने आपल्या प्रमुख शिफारशीत म्हटले आहे की, व्याज सवलतीची योजना तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पकालिक कर्जासाठी कायम ठेवली पाहिजे; मात्र तीन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असेल तर ही सुविधा उपलब्ध करू नये. कर्जाची रक्कम तीन लाखांपेक्षा जास्त असेल तर सध्याच्या नियमानुसार तीन लाखांपर्यंतच्या रकमेवर व्याज सवलत मिळते. मात्र समितीने हा नियम बदलण्याची व तीन लाखांपेक्षा कर्जाची जास्त रक्कम असेल तर व्याजाची सवलत देऊ नये, असे म्हटले आहे. कृषी क्षेत्र सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. हे ओझे कमी करण्यासाठी समितीने ठरलेल्या तारखेनंतर १२ महिन्यांनंतरही सबसिडी दिली पाहिजे.>समितीने काय म्हटले...समितीने म्हटले आहे की, ऊस आणि केळी यासारख्या पिकांचा अवधी मोठा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाच्या आत कर्ज परतफेड करणे कठीण होते. देशाच्या विविध भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी येत्या २ वर्षांपासून संकटाचा सामना करीत आहेत. उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असतानाच समितीच्या या शिफारशी आल्या आहेत.