शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

ना युती, ना आघाडी! मायावतींनी वाढदिवशीच केली मोठी घोषणा; लोकसभा एकट्याने लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 12:21 IST

उत्तर प्रदेशमध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत. मायावतींनी यादवांनंतर मोदींवरही टीका केली आहे.

लखनऊ: लोकसभेला भाजप प्रणित युती विरुद्ध काँग्रेस प्रणित आघाडी असे दोन गट एकत्र येऊन लढण्याची तयारी करत आहेत. असे असताना उत्तर प्रदेशमध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज वाढदिनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्य़ाची मायावतींनी घोषणा केली आहे. 

याचबरोबर मायावतींनी अखिलेश यादवांवर शाब्दिक हल्ला केला आहे. अखिलेश यादव हे सरड्यासारखे रंग बदलत असतात, त्यांच्यापासून सावध रहायला हवे. मी संन्य़ास घेणार अशी अफवा पसरविली जात आहे. मी आताच संन्यास घेणार नाहीय. अखेरच्या क्षणापर्यंत पक्षासाठी काम करत राहीन, असे मायावती यांनी म्हटले आहे. 

मायावतींनी यादवांनंतर मोदींवरही टीका केली आहे. फुकट रेशन देऊन जनतेला गुलाम बनवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप मायावतींनी केला. गेल्या चार सरकारच्या काळात आम्हीच सर्व लोकांच्या कल्याणासाठी आणि सर्व लोकांच्या सुखासाठी काम केले. आमच्यानंतर आलेली सरकारे आमच्या योजनांची कॉपी करून जनतेला विसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाही जातीयवादी, भांडवलशाही आणि संकुचित मानसिकतेमुळे या योजनांचा पूर्ण लाभ लोकांना मिळत नाहीय़, असा आरोप मायावती यांनी केला. 

ना आघाडी, ना युती... मायावतींनी दिले कारणयुती केल्याने पक्षाला फायदा कमी, पण तोटाच जास्त होतो. आपली मतांची टक्केवारीही कमी होते. मात्र इतर पक्षांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे बहुतांश पक्षांना बसपासोबत युती करून निवडणूक लढवायची होती. आमचा पक्ष एकट्याने लोकसभा निवडणूक लढवून चांगले निकाल आणेल. आम्ही एकट्याने निवडणूक लढवतोय कारण त्याचे सर्वोच्च नेतृत्व दलिताच्या हातात आहे. युती केल्याने, बसपची संपूर्ण मते आघाडीच्या पक्षाला जाते, परंतु त्या आघाडीचे मत, विशेषत: सवर्णांचे मत बसपाला पडत नाही. यामुळे आम्हाला आमचा जनाधार टिकवावाच लागेल, असे मायवती म्हणाल्या. 

टॅग्स :mayawatiमायावतीlok sabhaलोकसभाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी