शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात बोगस मतदार नाहीतच! निवडणूक आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:13 IST

मध्य प्रदेशात बोगस मतदार आढळून आले नसल्याचे निवडणूक आयोगाच्या पथकांच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्यात ६० लाख बोगस मतदार असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात बोगस मतदार आढळून आले नसल्याचे निवडणूक आयोगाच्या पथकांच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्यात ६० लाख बोगस मतदार असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यानंतर आयोगाने या प्रकरणी तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती केली होती. मात्र, बोगस मतदारांबाबत या पथकांना काहीही माहिती मिळाली नाही.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर प्रकरणातील वास्तव जाणून घेण्यासाठी आयोगाने दोन पथकांची नियुक्ती केली होती. एका पथकाने नरेला आणि भोजपूर विधानसभा मतदारसंघात तपास केला, तर अन्य पथकाने होशंगाबाद आणि सेवनी- मालवा मतदारसंघात कागदपत्रांची पाहणी केली. ही पथके ४ जून रोजी मध्य प्रदेशात दाखल झाली होती.एका अधिकाºयाने सांगितले की, २०१६मध्ये ६८ लाख बनावट मतदारांची ओळख निश्चित करण्यात आली होती. बहुधा याच नोंदींचा तक्रारीत उल्लेख असावा. त्यानंतर बहुतांश प्रकरणांत नोंदी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या त्रुटी दूर करण्यात येतील.सॉफ्टवेअरने शोधलेतपास अधिकाºयांनी सांगितले की, काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत. एका मतदारसंघात २० मतदान केंद्रांवर तपास करण्यात आला. आमच्या डुप्लिकेशन सॉफ्टवेअरने सुरुवातीला ४६ हजार डुप्लिकेट मतदार शोधून काढले. नंतर तपासणीत याची संख्या २४४२ वर आली. यातील २३९७ नोंदी बरोबर असल्याचे दिसून आले. उर्वरित४४ नोंदींपैकी १२ मतदारांचे निधन झाले आहे, तर काही जण स्थलांतरित झाले आहेत असे दिसून आले. ज्या नोंदीत त्रुटी वा विसंगती आहे अशा नोंदींची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही अहवाल आयोगासमोर ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेश