शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कोरोना इफेक्ट! यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्यांविना; ५५ वर्षांत प्रथमच असं घडणार 

By कुणाल गवाणकर | Updated: January 14, 2021 21:04 IST

१९६६ नंतर प्रथमच प्रमुख पाहुण्यांविना साजरा होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला कोणत्याही देशाचे प्रमुख उपस्थित नसतील. कोरोना संकटामुळे यंदाच्या सोहळ्याला कोणत्याही देशाचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. कोरोना संकट असल्यानं कोणत्याही देशाच्या प्रमुखाला निमंत्रित केलं गेलं नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. त्यामुळे ५५ वर्षांत पहिल्यांदाच देशाचा प्रजासत्ताक दिन कोणत्याही प्रमुख पाहुण्याशिवाय साजरा होईल.यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ब्रिटनमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातल्यानं जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केला. जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे कोणत्याही देशाच्या प्रमुखांना आमंत्रित करणं तितकंसं सोपं नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीत अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामुळे कोरोना पसरल्याचा आरोप करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वाढला असताना ट्रम्प यांना निमंत्रित करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.याआधी १९६६ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला निमंत्रित केलं गेलं नव्हतं. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं ताश्कंदमध्ये निधन झाल्यानं हा निर्णय घेतला गेला. घटनात्मक गरजा लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी पंतप्रधानाची शपथ घेतली. त्यावेळी देशात अतिशय साधेपणानं प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी