शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, लागण झाल्यास गंभीर आजारांचा धोका, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 08:01 IST

CoronaVirus News: ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या प्रवाशांमध्ये सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

नवी दिल्‍ली: देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा लाखाच्या घरात आला असल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात देशात कोरोनाची दुसरी लाट आली. ती लाट ओसरत असताना आता कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट चिंतेत भर घालत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीला (एनआयव्ही) कोरोना विषाणूचा B.1.1.28.2 व्हेरिएंट सापडला आहे. ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे. नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये गंभीर लक्षणं दिसून येऊ शकतात. या व्हेरिएंटमुळे बाधित व्यक्ती गंभीर आजारी पडू शकते. या व्हेरिएंटविरोधात लस प्रभावी ठरू शकते की नाही यासाठी स्क्रिनिंग करण्याची गरज आहे. एनआयव्हीनं केलेला अभ्यास bioRxiv मध्ये प्रसिद्ध झाला आहे. मात्र पुणे एनआयव्हीनं केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार B.1.1.28.2 व्हेरिएंटविरोधात कोवॅक्सिन प्रभावी आहे. कोवॅक्सिनचे दोन डोस घेतल्यावर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज या व्हेरिएंटला निष्प्रभ करण्यास सक्षम आहेत.B.1.1.28.2 व्हेरिएंटचे अतिशय प्रतिकूल परिणाम सीरियन उंदरांवर दिसून आले. यामध्ये वजन घटणं, श्वसन नलिकेत विषाणूची कॉपी तयार होणं, फुफ्फुसाचं अतिशय जास्त नुकसान या बाबी दिसून आल्या. एनआयव्हीच्या संशोधनानं SARS-CoV-2 च्या जीनोम सर्विलान्सची गरज व्यक्त केली आहे. रोगप्रतिकारशक्तीला चकवा देणाऱ्या व्हेरिएंट्सचा सामना करण्यासाठी जीनोम सर्विलान्स आवश्यक आहे. आजारासाठी जबाबदार असलेल्या म्युटंट्सचा शोध घेण्याचं काम जीनोम सिक्वन्सिंगच्या माध्यमातून केलं जातं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस