शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

सोनियांना टाळून नितीश कुमार करणार पंतप्रधान मोदींसोबत "लंच पे चर्चा"

By admin | Updated: May 27, 2017 12:41 IST

विरोधी पक्षीय नेत्यांच्या बैठकीपासून दूर राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,  दि. 27 -  राष्ट्रपतीपद उमेदवार निवडीबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या 17 विरोधी पक्षीय   नेत्यांच्या बैठकीपासून दूर राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 
 
पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनामध्ये सहभागी होण्याच्या निर्णयामुळे नितीश कुमार यांच्या भाजपासोबतच्या जवळकीतेसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 
राष्ट्रपतीपद निवडणूक तसंच 2019 लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यानिमित्त, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात महाआघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी तयारी सुरू केल्याचेही म्हटले जात आहे.  
 
पण, या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित राहिले. त्यातच आज पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी मात्र ते हजर राहणार आहेत. यावरुन राष्ट्रीय राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सोनियांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहण्याबाबत स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले आहेत की, ""विरोधी पक्षांच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. जेडीयूचे नेते शरद यादव या बैठकीत पार्टीचे प्रतिनिधित्व करत होते. मी सोनियांची एप्रिल महिन्यात भेट घेतली होती आणि ज्या मुद्यांवर आता चर्चा होणार होती त्यावर आधीच मी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना भोजनासाठी आमंत्रित केले होते."" नितीश कुमार यांनी पूर्वनियोजीत कार्यक्रम असल्याचे कारण देत या बैठकीला दांडी मारली होती.  
 
दरम्यान, शुक्रवारी (26 मे) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 17 पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.   राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, सीताराम येचुरी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जेडीयूचे नेते शरद यादव, ओमार अब्दुल्ला, के.सी त्यागी तसंच समाजवादीचे नेते रामगोपाल यादव या बैठकीसाठी हजर होते.